‘लाडकी बहीण योजने’नंतर सुरु केलेली मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे? कुणाला मिळणार लाभ? CM Vayoshri Yojana

1 Min Read
Cm Vayoshri Yojana Benefits And Eligibility

Mukhyamantri Vayoshri Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारी योजना आहे. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दर वर्षाला सरकारकडून तीन हजार रूपये मदत मिळणार आहे.

महाराष्ट्र शासनाकडून सृरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकला नाही त्यांच्याकडून लाडकी बहीण सारख्या ईतर योजना सुरु करण्याची मागणी होत आहे. अशातच आता ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात येत आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांमार्फत राबवली जाणार आहे.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

महाराष्ट्रातील ६५ वर्षे आणी त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा तसेच त्यांच्या अत्यावशक औषधं उपचारासाठी पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सरकारकडून ३ हजार रुपये जमा केले जाणार आहेत. मुख्यमंत्री वयोश्री योजनेबाबतची अधिक माहिती सरकारकडून लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना आवश्यक कागदपत्रे

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे:

  • आधारकार्ड
  • मतदानकार्ड
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याची पासबूक झेरॉक्स
  • स्वयं घोषणापत्र
  • शासनाने ओळखपत्र पटवण्यासटी विहीत केलेली अन्य कागदपत्रे पुरावा म्हणून आवश्यक असतील.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article