DBT Transfer आजपासूनच सुरु, 29 सप्टेंबर पर्यंत सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे Majhi Ladki Bahin Yojana Latest News

2 Min Read
Dbt Transfer Majhi Ladki Bahin Yojana Third Installment Status

Ladki Bahin Yojana Payment Status :रायगडमध्ये 29 सप्टेंबरला माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे पैसे वितरित करण्यात येणार होते. पण नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्याची रक्कम बँकेकडे पाठवण्यात आली असून. बँक हळूहळु पात्र महिलांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु करणार आहे. (Majhi Ladki Bahin Yojana third installment DBT transfer starts today, all eligible women to receive funds in their accounts by September 29. Read the latest updates here).

Ladki Bahin Yojana Third Installment Date : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची बातमी समोर आली होती त्यामुळे महिला 29 सप्टेंबरची आतुरतेने वाट पाहत होत्या. पण, महिला व बालविकास मंत्रालयातील सूत्रांकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेकडे पाठवण्यात आले असून बँक आजपासूनच डीबीटी (DBT Transfer) प्रक्रिया सुरु करणार आहे. आणी 29 सप्टेंबर पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. 

Majhi Ladki Bahin Yojana Free Mobile Fake News Alert
🔴 ही बातमी वाचली का?🤞

त्यामुळेच तुमच्या बँक खात्यात तिसऱ्या हफ्त्याचे पैसे आता केव्हाही जमा होऊ शकतात. अनेकदा बँक खात्यात पैसे जमा होऊनही मोबाईलवर मेसेज येत नाही त्यामुळेच आपले बँक खाते एकदा चेक करा.

कुणाच्या खात्यात किती रुपये जमा होतील?

जुलै आणी ऑगस्ट महिन्याचे हफ्ते जमा झालेल्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये तर जुलै ऑगस्ट मध्ये अर्ज पात्र ठरून देखील ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या बँक खात्यात जुलै ऑगस्ट आणी सप्टेंबर असे तीन महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार असून सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना केवळ याच महिन्याचा लाभ मीळेल म्हणजेच त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील अशी माहिती आहे.

2 कोटींहून अधिक महिला लाभार्थी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सप्टेंबर महिन्यात आलेल्या अर्जाची छाननी पूर्ण होताच आता दोन कोटी पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article