दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणार असाल तर वेळीच व्हा सावध Diwali 2024 Gold Shopping Fraud Alert

4 Min Read
Diwali 2024 Gold Shopping Fraud Alert

Diwali 2024 Gold Shopping Fraud Alert : यंदा दिवाळी 2024, 31 ऑक्टोबरला आहे तर लक्ष्मी पूजन हे 1 नोव्हेंबरला आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर घरात काही ना काही खरेदी करावी जसे भांडी, झाडू, सोने चांदी इत्यादी हे पुरातन काळापासून चालत आलेला रिवाज आहे कारण तसे करणे शुभ मानले जाते. दरवर्षी दिवाळीला आपण सर्वजण आपापल्या परीने सोने चांदी खरेदी करतच असतो पण या 21 व्या डिजिटल जगात हे इतके सोपे राहिलेले नाही. सोने चांदी खरेदीवेळी केलेल्या छोट्याशा दुर्लक्षामुळे तुम्हाला मोठा फटका बसू शकतो, हे विसरू नका. सोने चांदी खरेदी वेळी कोणत्या गोष्टीकडे खास लक्ष दिले पाहिजे जेणेकरून आपण फ्रॉड होण्यापासून स्वतःला वाचवू शकतो त्याबद्दल जाणून घेऊयात… (As Diwali 2024 approaches, be wary of gold shopping frauds. Learn essential tips to protect yourself while purchasing gold and silver this festive season).

सोने खरेदी करताना या काही खास गोष्टी कायम लक्षात ठेवा 

ऑनलाइन सोने खरेदी करणे टाळा

आजकाल फ्लिपकार्ट, ऍमेझॉन यासारख्या इ कार्ट व शॉपिंग साईट्सवरून शॉपिंग करणे काही नवीन नाही आपण सर्वजण यांवरून काही ना काही वस्तू मागवतच असतो ती आपली सवयच बनली आहे. पण सोने चांदी ही काही ऑनलाईन शॉपिंग करण्याची गोष्ट नाही त्यामुळे सोने तुमी ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्षात दुकानात जाऊनच खरेदी करावे. बाजारात असे अनेक ॲप्स उपलब्ध आहेत जे तुम्हाला मोबाईल वरून सोने खरेदी करण्याचे आमिष दाखवतात त्यासाठी ते ग्राहकांना भरपूर डिस्काउंट व विविध ऑफर्स ची भुरळ घालतात, पण एका ताज्या सर्वेनुसार त्यातील 90% ॲप्स हे खोटे व फ्रॉड आहेत. त्यामुळे त्यांच्या नादी न लागता तुम्ही सोने चांदी हे प्रत्यक्षात दुकानात जाऊनच खरेदी करावे.

कोणताही अनोळखी ईमेल किंवा संदेश उघडू नका

दिवाळीनिमित्त सर्वच लोक खरेदी करतात हे सर्वांनाच माहिती आहे. डिजिटल फ्रॉड करणारे लोक याच गोष्टीचा फायदा घेऊन तुम्हाला कोणत्याही अनोळखी नंबर वरून कोणताही इमेल किंवा एसएमएस पाठवू शकतात त्या ई-मेल किंवा एसएमएस मध्ये एखादी अशी लिंक असू शकते त्यावर क्लिक करून ती ओपन केली तर कदाचित तुमचे बँक खातेही रिकामे होऊ शकते व तुमचा फोनही हॅक होऊ शकतो यामुळे तुम्ही अशा कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेल्या ई-मेल किंवा एसएमएस ला उत्तर देऊ नये अथवा उघडून पाहू ही नये.

हॉलमार्क चेक केल्याशिवाय सोने खरेदी करू नका 

दुकानात जाऊन प्रत्यक्ष सोने चांदी खरेदी करताना सुद्धा काही काळजी घ्यावी लागते जसे की सोने विकत घेताना त्यावर हॉलमार्क चिन्ह आहे की नाही हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. बिना हॉलमार चिन्हाचे सोने हे नकली सोने असे सुद्धा ग्राह्य धरले जाऊ शकते त्यामुळे तुम्ही सोने खरेदी करताना हॉलमार्क चिन्ह असलेले सोने खरेदी करा.

बिल घ्यायला अजिबात विसरू नका

दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वच सोन्या चांदीच्या दुकानांमध्ये खूप गर्दी असणार हे सर्वांना माहिती आहे पण या गर्दीतून वाचण्यासाठी किंवा वेळ वाचवण्यासाठी तुम्ही सोने खरेदी केल्यानंतर बिल नंतर घेऊ किंवा बिल नको असे अजिबात म्हणू नका. बिल घेतल्याशिवाय येऊच नका, कारण नंतर जेव्हा तुम्हाला ते सोने विकायचे असेल तेव्हा तुम्हाला बिना बिलाशिवाय ते विकताना खूप कमी दराने विकावे लागेल. म्हणून दुकानातुन सोने-चांदी खरेदी केल्यावर बिल घ्यायला विसरू नका.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article