Diwali 2024 PPF Investment : दिवाळीला आता अवघे काहीच दिवस उरले आहेत. आज आम्ही तुम्हाला एका सरकारी गुंतवणूक योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही फक्त पाच हजार रुपये गुंतवून काही वर्षांत 16.27 लाख रुपये परत मिळवू शकता. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. चाला तर मग त्या योजनेबद्दल जाणून घेऊयात… (On the auspicious occasion of Diwali, invest just 5,000 rupees to earn 16.27 lakh rupees in a few years. Secure your financial future by investing in the PPF scheme).
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात. सध्या 2024 मध्ये या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.1 टक्के व्याज मिळत आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना भारतात खूपच लोकप्रिय आहे.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत तुम्हाला 15 वर्षांसाठी पैसे गुंतवावे लागतील. 15 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी संपल्यानंतर, हवे असल्यास तुम्ही तुमचा गुंतवणुकीचा कालावधी आणखी 5 वर्षांसाठी वाढवू शकता. या योजनेत तुम्ही वार्षिक किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. दीर्घ कालीन सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.
या योजनेत तुम्ही 5,000 रुपये गुंतवून काही वर्षांत 16.27 लाख रुपये जमा करू शकता.
- यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीपीएफ योजनेत खाते उघडावे लागेल.
- पीपीएफ योजनेत खाते उघडल्यानंतर, तुम्हाला दरमहा 5,000 रुपये जमा करावे लागतील.
- म्हणजेच या योजनेत तुम्हाला वार्षिक 60,000 रुपये गुंतवावे लागतील.
- तुम्हाला ही गुंतवणूक एकूण 15 वर्षांसाठी करावी लागेल.
- सध्याच्या 7.1 टक्के व्याजदराने मुदतपूर्तीवेळी तुमचे एकूण 16,27,284 रुपये जमा झाले असतील. तुमची गुंतवणूक 9 लाख रुपये + व्याज 7 लाख 27 हजार 284 रुपये).