आत्ताच करा या सरकारी योजनेसाठी अर्ज, दिवाळी पर्यंत मीळेल मोफत गॅस सिलेंडर Free Gas Cylinder Yojana 2024 Maharashtra

2 Min Read
Free Gas Cylinder Yojana Maharashtra 2024

Free Gas Cylinder Yojana 2024 Maharashtra Online Registration | PM Ujjwala Yojana: प्राचीन हिंदू कॅलेंडरनुसार, दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पंधराव्या दिवशी अमावस्येला साजरी केली जाते. दिवाळीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. यंदा (Diwali 2024) 2024 मध्ये दिवाळी (लक्ष्मी पूजन) शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024 रोजी आहे. आज आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या एका फायदेशीर योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यासाठी तुम्ही आत्ता लवकरात लवकर अर्ज केलात तर तुम्हाला येत्या दिवाळीपर्यंत मोफत गॅस सिलिंडरचा लाभ मिळू शकेल. भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. ही योजना भारत सरकारने 2016 मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकार देशातील गरजू महिलांना मोफत गॅस सिलेंडर देते. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांना मोफत गॅस सिलेंडरचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेसाठी अर्ज करून मोफत गॅस सिलेंडरचा लाभ कसा मिळू शकतो त्याविषयीं सविस्तर माहिती घेऊयात… (Apply for the Free Gas Cylinder Yojana 2024 in Maharashtra. Eligible BPL women can receive a free gas cylinder under PM Ujjwala Yojana. Check eligibility and apply now!).

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बीपीएल कार्ड
  • बीपीएल यादीतील नावाची प्रिंट
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक खात्याची झेरॉक्स (तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी लिंक असले पाहिजे)
  • वयाचा दाखला
  • मोबाईल क्रमांक

(BPL कुटुंबातील महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करू शकतात).

या योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://www.pmuy.gov.in/index.aspx वर जाऊन या योजनेसाठी सहजपणे अर्ज करू शकता.

जर तुम्ही पात्र असाल आणी तुम्ही लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज केलात तर येत्या दिवाळी पर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article