मोफत आधार अपडेट करण्यासाठी आता थोडेच दिवस शिल्लक, Free Update Aadhar Card Online

3 Min Read
Free Update Aadhar Card Online Uidai September 2024

Free Update in Aadhar Card | आधार कार्ड मोफत अपडेट: आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी आता फक्त 17 दिवस शिल्लक आहेत.  युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे.

Free Update Aadhar Card Online : आधार कार्ड मोफत अपडेट करण्याच्या संधीसाठी आता फक्त 17 दिवस शिल्लक आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची तारीख 14 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत १४ जून २०२४ होती, त्यानंतर ती तीन महिन्यांनी वाढवण्यात आली होती. मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त ऑनलाइन आधार अपडेट करण्यासाठी उपलब्ध आहे, म्हणजेच जर तुम्ही आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करून घेतल्यास, त्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील.

आधार कार्डवरील कोणती माहिती मोफत अपडेट करता येते? 

तुम्ही myAadhaar पोर्टलवर जाऊन तुमच्या आधार कार्डवरील महत्त्वाची माहिती जसे की आधार कार्डवरील पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर इत्यादी मोफत अपडेट करू शकता. पण, काही माहिती जसे की आइरिस (Iris) किंवा बायोमेट्रिक डेटा अपडेट करण्यासाठी, तुम्हाला आधार केंद्रावरच जावे लागेल.

आधार ऑनलाइन कसे अपडेट करायचे?

आधार कार्ड ऑनलाइन अपडेट करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:

  • 1: आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सर्व प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा. 
  • 2: त्यानंतर आधार अपडेटचा पर्याय निवडा.
  • 3: जर तुम्हाला पत्ता अपडेट करायचा असेल तर अपडेट ॲड्रेसच्या पर्यायावर क्लिक करा. 
  • 4: नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकून OTP वेरिफाय करा. 
  • 5: Documents Update चा पर्याय निवडा. 
  • 6: तुमच्या आधारशी संबंधित सर्व तपशीलांची पडताळणी करा.  पत्ता अपडेटसाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 
  • 7: आधार अपडेट प्रक्रिया स्वीकारा.
  • 8: शेवटी तुम्हाला एक 14 अंकी अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) मिळेल, या नंबरद्वारे तुम्ही तुमच्या आधार अपडेटची स्थिती तपासू शकता.

आधार कुठे आवश्यक आहे?

आजकाल अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले आहे. उदाहरणार्थ, बँक खाते उघडणे, सरकारी योजनांचा लाभ घेणे, सिम कार्ड खरेदी करणे आणि मालमत्ता, घर खरेदी करणे यासारख्या पैशांशी संबंधित सर्व कामांसाठी आधार आवश्यक आहे. आधार कार्ड वेळेवर अपडेट न केल्यास अनेक महत्त्वाच्या कामात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे आधार कार्डवरील माहिती योग्य आणि वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे आहे.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article