Gold Price Today 15 August 2024: आज 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यदिनी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 आणि 22 कॅरेट सोने आज 250 रुपयांनी स्वस्त झाले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 71,500 रुपये झाला आहे.
Gold Rate Today: आज देशभरात सोने 250 रुपयांनी स्वस्त झाले आहे. Gold Rate Today 15 August 2024: आज 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 आणि 22 कॅरेट सोने आज 250 रुपयांनी स्वस्त झाले आहे. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 71,650 रुपये आहे. मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तेच चांदीबद्दल बोलायचे झाले तर चांदीची किंमत 82,900 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली आहे. चांदीतही कालच्या तुलनेत आज 100 रुपयांनी घट झाली आहे. देशातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये आणी png ज्वेलर्स मध्ये आज 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत काय आहे ते जाणून घेऊयात…
दिल्लीत सोन्याचा भाव
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 65,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 71,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबईत आज सोन्याचा भाव
मुंबईत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 65,540 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
देशातील इतर प्रमुख शहरांमधील आजचा सोन्याचा भाव
शहर | 22 कॅरेट सोन्याचा दर | 24 कॅरेट सोन्याचा दर |
---|---|---|
मुंबई | 65,540 | 71,500 |
अहमदाबाद | 65,590 | 71,550 |
चेन्नई | 65,500 | 71,500 |
कोलकाता | 65,540 | 71,500 |
गुरुग्राम | 65,690 | 71,650 |
लखनौ | 65,690 | 71,650 |
बेंगळुरू | 65,540 | 71,500 |
जयपूर | 65,690 | 71,650 |
पाटणा | 65,590 | 71,680 |
भुवनेश्वर | 65,540 | 71,550 |
हैदराबाद | 65,540 | 71,500 |
Png ज्वेलर्स मधील आजचा सोन्याचा दर | Png Gold Rate Today 15 August 2024
सोन्याचा दर | (प्रति 10 ग्रॅम) |
---|---|
24 CT | ₹70,900.00 |
23 CT | ₹68,400.00 |
22 CT | ₹65,900.00 |
18 CT | ₹55,300.00 |
14 CT | ₹42,500.00 |
चांदीचा दर | (प्रति किलो) |
---|---|
चांदी | ₹82,000.00 |
(Png मधील सोन्याचे दर GST वगळून आहेत, हे png मधील सोन्याचे लेटेस्ट दर 11:00 am ला अपडेट केले जातात).
बुधवारी हा होता सोन्याचा भाव
काल सोन्याने 73,000 रुपयांचा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे बुधवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्याचा भाव 300 रुपयांनी वाढून 73,150 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.