Gold Rate Today: पितृपक्षामुळे सध्या देशात सोन्याची खरेदी मंदावली असली तरी या एका आठवड्यात सोन्याचा दर वाढला आहे.
Gold Rate Today in India 22 September 2024 | भारतातील आजचा सोन्याचा दर 22 सप्टेंबर 2024: आज रविवार, 22 सप्टेंबर रोजी देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 76000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात 1040 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही आठवडाभरात 1000 रुपयांची वाढ झाली आहे.
सध्या चांदीचा भाव 93,000 रुपये प्रति किलो आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत किती आहे ते जाणून घेऊयात…
दिल्लीत सोन्याचा भाव
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,080 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबईत सोन्याचा भाव
मुंबईत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 69,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
कोलकात्यात सोन्याचा भाव
कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,600 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,930 रुपये आहे.
जयपूर मध्ये सोन्याचा भाव
जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 69,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,080 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अहमदाबादमध्ये सोन्याची किंमत
अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आणी 24 कॅरेट सोन्याची किंमत 75,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नईमध्ये सोन्याचा भाव
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,600 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 75,930 रुपये आहे.