Gold Price Today 30 October 2024: आज बुधवार ३० ऑक्टोबर २०२४ रोजी छोटी दिवाळीच्या मुहूर्तावर सोने महाग झाले आहे. कालच्या तुलनेत आज ३० ऑक्टोबरला सोन्याच्या दरात 600 रुपयांनी वाढ झाली आहे. आज भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 80,600 रुपये आहे. व 22 कॅरेट सोन्याचा दर 73,800 रुपये आहे. तर, चांदी 99,100 रुपये प्रतिकिलो आहे. (Gold Price Today 30 October 2024: Gold prices rose ahead of Diwali, with 24-carat gold reaching 80,600 rupees. Check today’s gold rates in Delhi, Mumbai, Hyderabad, and other major cities).
Gold Rate Today : भारतातील हंगामी मागणी आणि पश्चिम आशियातील संघर्षाचे भू-राजकीय धोके यासारख्या इतर अनेक घटकांचा प्रभाव सोन्याच्या किंमतीवर स्पष्टपणे दिसून येत आहे. जुलैमध्ये सरकारने सोने आणि इतर धातूंवरील कस्टम ड्युटी कमी केल्यानंतर स्थानिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत 7 टक्क्यांनी मोठी घसरण झाली. आता सण आणि लग्नसराईमुळे मागणी वाढू लागली आहे त्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होत आहे. देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा आजचा दर जाणून घेऊयात…
🔴 हेही वाचा 👉 Dhanteras 2024 धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या, कायदेशीररीत्या तुम्ही घरात किती सोने ठेवू शकता.
Gold Rate Today | सोन्याचा भाव आज ३० ऑक्टोबर २०२४
शहर | 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव | 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव |
---|---|---|
दिल्ली | 73,910 | 80,610 |
मुंबई | 73,760 | 80,460 |
अहमदाबाद | 73,810 | 80,510 |
हैदराबाद | 73,760 | 80,460 |
चेन्नई | 73,760 | 80,460 |
पाटणा | 73,810 | 80,510 |
कोलकाता | 73,760 | 80,460 |
गुरुग्राम | 73,910 | 80,610 |
लखनौ | 73,910 | 80,610 |
बंगळुरू | 73,760 | 80,460 |
जयपूर | 73,910 | 80,610 |