Gold Rate Today 1 December 2024: नवीन महिन्याची सुरुवात सोने खरेदीदारांसाठी आनंदाची ठरली आहे. 1 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. काल (30 नोव्हेंबर) रोजी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती, परंतु आज संध्याकाळी सोन्याचा दर उतरला.
Contents
सोन्याच्या किमतीत घट का झाली?
तज्ज्ञांच्या मते, सोन सध्या एका विशिष्ट श्रेणीत व्यापार करत आहे. किंमतीत लहानसा चढ-उतार होत राहतो. मात्र, 2025 मध्ये सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सोन प्रति 10 ग्रॅम ₹90,000 पर्यंत जाऊ शकते. त्यामुळे डिसेंबर 2024 ही सोन खरेदीसाठी उत्तम वेळ आहे.
आजची सोन्याची किंमत (1 डिसेंबर 2024):
- 22 कॅरेट सोनं: ₹71,500 प्रति 10 ग्रॅम
- 24 कॅरेट सोनं: ₹78,000 प्रति 10 ग्रॅम
देशातील प्रमुख शहरांतील आजचा सोन्याचा दर:
शहर | 22 कॅरेट सोनं (₹) | 24 कॅरेट सोनं (₹) |
---|---|---|
दिल्ली | 71,650 | 78,150 |
नोएडा | 71,650 | 78,150 |
मुंबई | 71,500 | 78,000 |
अहमदाबाद | 71,550 | 78,050 |
कोलकाता | 71,500 | 78,000 |
जयपूर | 71,650 | 78,150 |
बेंगळुरू | 71,500 | 78,000 |
लखनौ | 71,650 | 78,150 |
पटना | 71,550 | 78,050 |