ABY: मोफत उपचाराचा लाभ घ्यायचा आहे? मग जाणून घ्या महाराष्ट्रात आयुष्मान कार्ड कसे बनवायचे

2 Min Read
How To Make Ayushman Card In Maharashtra

Ayushman Card: केंद्र सरकार आणी महाराष्ट्र राज्य दोन्ही सरकार आपापल्या स्तरावर अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवत आहेत. सरकारद्वारे राबावल्या जाणाऱ्या ज्या योजनांसाठी तुम्ही पात्र असाल त्या सर्व योजनांचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. येथे आम्ही तुम्हाला भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘आयुष्मान भारत योजना’ या योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेत सहभागी होऊन तुम्ही मोफत उपचाराचा लाभ घेऊ शकता.

या योजनेमार्फत तुम्हाला दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते. जर अजूनही तुम्ही या योजनेचा लाभ घेत नसाल तर तुम्ही या योजनेचा लाभ आवश्य घेतला पाहिजे.

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवावे लागेल. आम्ही येथे तुम्हाला आयुष्मान कार्ड कसे बनवायचे ते सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया आयुष्मान कार्ड कस बनवायचं?… (how to make ayushman card in maharashtra).

महाराष्ट्रात आयुष्मान कार्ड कसे बनवायचे

आयुष्मान कार्ड मिळवण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा:

  • 1: अर्ज करण्यासाठी प्रथम जवळच्या जनसेवा केंद्रात जावा.
  • 2: जनसेवा केंद्रात जाऊन संबंधित अधिकाऱ्याला भेटा.
  • 3: तुम्हाला आयुष्मान कार्डसाठी अर्ज करायचा आहे म्हणून सांगा.
  • 4: तुमच्याकडून आवश्यक कागदपत्रे मागितली जातील, ती त्यांना द्या.
  • 5: आवश्यक कागदपपात्रांमध्ये तुम्हाला तुमचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, रेशन कार्ड आणि तुमचा मोबाइल नंबर लागेल.
  • 6:  दिलेल्या कागदपत्रांची अधिकाऱ्याकडून तपासणी केली जाईल.
  • 7: कागदपत्र तपासणीसोबतच अर्जदाराची पात्रताही तपासली जाते.
  • 8: तुम्ही पात्र असल्यास आणि तुमची कागदपत्रेही बरोबर असल्यास तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.
  • 9: यानंतर तुमचे आयुष्मान कार्ड तयार होते.
  • 10: काही दिवसांत तुम्ही तुमचे आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता आणि या कार्डद्वारे तुम्ही मोफत उपचार सेवेचा लाभ घेऊ शकता.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article