Independence Day 2024 Wishes Images Cyber Crime Alert: दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 15 ऑगस्ट हा दिवस संबंध देशवासियांसाठी खूप खास असणार आहे. कारण या दिवशी देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो. प्रत्येक भारतीय आपला स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट मोठ्या अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करतो. या दिवशी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वज फडकवतात, तसेच लोक आपापल्या घर, कार्यालय, शाळा, कॉलेज, सोसायटी इत्यादी ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवून तिरंग्याचा सन्मान करतात. सध्या व्हॉट्सॲप, सोशल मीडिया किंवा मेसेजिंगद्वारे 15 ऑगस्टच्या शुभेच्छा (Independence Day Wiahes) पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे.
अशातच लोकांची फसवणूक करून त्यांची बँक खाती रिकामी करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी नवी शक्कल लढवली आहे. तुम्हाला आलेला एखादा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारा मेसेज (independence day message) व्हायरसने भरलेला असू शकतो किंवा तुम्हाला असा एखादा संदेश येऊ शकतो ज्यातील लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. होय, असे होऊ शकते कारण फसवणूक करणारे सध्या याच ट्रिकचा वापर करून लोकांची फसवणूक करत आहेत. असली फसवणूक टाळण्यासाठी तुम्हाला आलेल्या संदेशांबाबत काळजी कशी घ्यावी ते जाणून घेऊयात…
अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा संदेशांवर क्लिक करू नका
15 ऑगस्टच्या निमित्ताने तुम्हाला अनोळखी नंबरवरून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारा संदेश आला किंवा तुम्हाला व्हॉट्सॲप किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनोळखी व्यक्तीकडून 15 ऑगस्ट शुभेच्छा संदेश आला तर त्यावर क्लिक करू नका. फसवणूक करणाऱ्यांची ही नवीन पद्धत आहे.
खरंतर, या पाठवलेल्या मेसेजमध्ये एक लिंक आहे, त्यावर क्लिक करताच तुमचा मोबाईल हॅक होतो आणि फसवणूक करणारे याचा फायदा घेतात आणि तुमची वैयक्तिक माहिती गोळा करतात, ते तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात. त्यामुळे कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.
तुमचा फोटो क्लिक केला जाऊ शकतो
आजकाल फसवणूक करणारे लोकांना ‘तुम्हाला माझ्यापूर्वी असा मेसेज कोणीही पाठवला नसेल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा’ अशी लिंक पाठवत आहेत. तुम्ही त्यावर क्लिक करताच तुमच्या कॅमेऱ्याचा प्रवेश (access) फसवणूक करणाऱ्यांकडे जातो.
यानंतर, फसवणूक करणारे तुमच्या खाजगी क्षणांचे फोटो क्लिक करतात आणि तुम्हाला ब्लॅकमेल करतात आणि पैसे मागतात. लोक बळजबरीने हॅकर्सना जेवढे पैसे मागतील तेवढे देतात. पैसे न दिल्यास तुमचे फोटो इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळेच कोणत्याही अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या मेसेजवर क्लिक करू नका.
तुमची जर अशी फसवणूक झाली असेल तर सायबर क्राईम च्या अधिकृत वेबसाईट https://cybercrime.gov.in/ वर तुमची तक्रार नोंदवा.
अस्वीकरण: आमच्या वेबसाइटवर प्रदान केलेली माहिती केवळ जागरुकतेसाठी आहे आणि इंटरनेटवर उपलब्ध स्त्रोतांकडून गोळा केली गेली आहे. आम्ही कोणत्याही मताचे किंवा दाव्याचे समर्थन करत नाही. माहितीच्या अचूकतेची स्वतंत्रपणे पडताळणी करा.