Indian Railways Rules : भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कमधील एक आहे. भारतीय रेल्वेतून दररोज कोट्यवधी प्रवासी प्रवास करतात. भारतीय रेल्वेने प्रवाशांची सोय व्हावी याकरता अनेक नियम केले आहेत. याशिवाय प्रवाशांना प्रवास करताना चांगला अनुभव कसा देता येईल? या संदर्भातही भारतीय रेल्वेकडून रेल्वे गाड्यांमध्ये अनेक प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे. पण, प्रत्येकाने ट्रेनने प्रवास करण्यापूर्वी तिकीट खरेदी करणे आवश्यक आहे. जर कुणी विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करताना पकडले गेल्यास त्यांना दंड होऊ शकतो. हे माहित असूनही, गडबडीत वेळेअभावी, किंवा जाणूनबुजून अनेकजण तिकीट न काढता ट्रेनमध्ये चढतात. आणी यासाठी त्यांना रेल्वेकडून दंड होऊ शकतो. विना तिकीट ट्रेनमधून प्रवास केल्यास किती दंड आकारला जाऊ शकतो? ते जाणून घेऊयात…
Indian Railways Rules (भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार), जर तुम्ही विना तिकीट ट्रेनमधून प्रवास करताना पकडले गेलात तर, तुम्हाला 250 रुपये दंड आणि तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे तिथपर्यंतचे पूर्ण तिकीट आकारले जाईल. हे भरून घेतल्यानंतर, ट्रेनमध्ये एखादी सीट रिकामी असल्यास टीटीई तुम्हाला जागा देऊ शकते. टीटीईकडे एक खास प्रकारचे हॅन्ड मशीन असते ज्याच्या मदतीने ते तुम्हाला ट्रेनचे तिकीट काढून देतात.
भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन सुद्धा ट्रेनमधून प्रवास करू शकता. पण, प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन वेळेअभावी तिकीट न काढता ट्रेनमध्ये चढल्यानंतर, तुमचे तिकीट काढण्यासाठी तुम्हाला लगेच TTE शी संपर्क साधावा लागेल असा नियम आहे.
प्लॅटफॉर्म तिकीट हे तुम्ही कोणत्या स्टेशनवरून ट्रेनमध्ये चढलात याचा पुरावा असते. यूटीएस ॲपच्या मदतीने तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट ऑनलाइन बुक करू शकता. यूटीएस ॲपद्वारे प्लॅटफॉर्म तिकीट बुक करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे.