Kisan Credit Card Apply Online | किसान क्रेडिट कार्ड नोंदणी प्रक्रिया : देशातील शेतकऱ्यांना कोणत्याही आर्थिक समस्येचा सामना करावा लागू नये तसेच शेती किंवा ईतर कोणत्याही कामासाठी आर्थिक अडचण येऊ नये यासाठी राज्य सरकारी आणि केंद्र सरकारकडून अनेक फायदेशीर आणि कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. (Learn how to apply for a Kisan Credit Card with just 3 documents. Get low-interest loans for agriculture. Follow the simple steps to apply online for Kisan Credit Card in Maharashtra).
त्याच अनुषंगाने सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड दिले जात आहेत. ज्याद्वारे शेतकऱ्यांना खूप कमी व्याजावर कर्ज मिळते. जर तुम्ही देखील पात्र असाल तर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड बनवू शकता. किसान क्रेडिट कार्ड कसं काढायच आणि यासाठी तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे ते येथे जाणून घ्या.
किसान क्रेडिट कार्ड कसं बनवायच
जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड बनवू शकता. किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
- 1: सर्वप्रथम तुम्हाला ज्या बँकेचे किसान क्रेडिट कार्ड पाहिजे आहे त्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- 2: बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर असणाऱ्या किसान क्रेडिट कार्ड पर्यायावर क्लिक करा.
- 3: त्यानंतर अर्जदाराचे नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक इत्यादी सर्व माहिती भरा आणी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- 4: आणी सबमिट बटणावर क्लिक करा. तुमचा अर्ज यशस्वीरित्या बँकेकडे जमा होईल. त्यानंतर तुम्हाला बँकेकडून कॉल येईल. आणी पुढची प्रक्रिया पूर्ण होताच तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मीळेल.
किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत
(Kisan Credit Card Documents in Marathi)
- 1: शेतजमिनीची कागदपत्रे
- 2: आधार कार्ड
- 3: रेशन कार्ड किंवा लाईट बिल
- मोबाइल नंबर आणी पासपोर्ट आकाराचा फोटो