Ladki Bahin Yojana 2100 Rupees: लाडकी बहीण योजनेवर राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महिलांना २१०० रुपये कधी मिळणार याबाबत विचारले असता त्यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
२१०० रुपये वाटपासाठी नवीन सर्वेक्षण
भरत गोगावले यांनी स्पष्ट केले की, २१०० रुपये वाटप करताना महिलांचे नवीन सर्वेक्षण होईल. या सर्वेक्षणामध्ये महिलांकडे असलेल्या वाहनांची तसेच इतर मालमत्तेची तपासणी होणार आहे. या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी टाळण्यासाठी दक्षता घेतली जाईल.
महिला लाभार्थींना १५०० रुपये सुरूच राहतील
गोगावले यांनी महिलांच्या शंका दूर करत सांगितले की, सर्वेक्षण प्रक्रिया सुरु असतानाही १५०० रुपयांचा लाभ बंद होणार नाहीत. या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यावर भर दिला जाईल.
महायुतीच्या निवडणूक वचनपूर्तीबाबत आशा
महायुतीने निवडणुकीच्या काळात १५०० रुपयांची रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप महिलांच्या खात्यात वाढीव रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे महिलांमध्ये याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
कॅबिनेट मंत्रिमंडळाचा निर्णय प्रलंबित
लाडक्या बहिणींना २१०० रुपयांच्या वाटपाबाबतचा अंतिम निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळात घेतला जाणार असून, लवकरच लाभार्थींना या निर्णयाचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.
लाडकी बहीण योजना महिला सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण आहे. २१०० रुपयांचा लाभ देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. महिलांनी सर्वेक्षण प्रक्रियेत सहकार्य करावे, अशी विनंती सरकारने केली आहे.