Maharashtra Cabinet Decision Today : आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय जाणून घ्या

2 Min Read
Maharashtra Cabinet Decisions Today 7 August 2024 (Image Credit: इंस्टाग्राम)

Maharashtra Cabinet Meeting News Today : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ते निर्णय कोणते ते जाणून घेऊयात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत ते खालीलप्रमाणे : (maharashtra cabinet decision today)

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

maharashtra government decision today in marathi:

  • 1: शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन महत्वाकांक्षी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता; पावणे चार लाख हेक्टर क्षेत्राचे सिंचन होणार.
  • 2: आता प्रकल्पबाधितांना सदनिका मिळणार. धोरणास मान्यता.
  • 3: लहान शहरांतील पायाभूत सुविधांना वेग येणार; कर्ज उभारण्यास मान्यता.
  • 4: आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ.
  • 5: अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणार. अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय.
  • 6: विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार रुपये दंड होणार.
  • 7: महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार. पाच वर्षात तीस हजार कोटींचे उत्पन्न मिळणार.
  • 8: कागल येथे आयुर्वेद महाविद्यालय ; आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय.
  • 9: न्यायमूर्ती, मुख्य न्यायमूर्तीना सेवा निवृत्तीनंतर घर कामगार, वाहनचालक सेवा.
  • 10: सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्कात १०० टक्के सूट.
  • 11: जुन्नरच्या श्री कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेस अर्थसहाय्य.
  • 12: ९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविणार.अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविणार. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार.
  • 13: अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेस मंजुरी.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article