Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जुलै आणी ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरलेल्या व ज्यांच्या खात्यात अजून लाडकी बहीण योजनेचा एक रुपयाही जमा न झालेल्या महिलांच्या खात्यात एकाएकी 4500 रुपये जमा झाल्याने खात्यात पैसे जमा झालेल्या महिला आनंदी झाल्या आहेत. तर सप्टेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केलेल्या व ज्यांच्या खात्यात जुलै आणी ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा झाले होते अशा महिलांना त्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार असा प्रश्न पडला आहे. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात… (Majhi Ladki Bahin Yojana: Women received ₹4500 under the scheme, but when will the next ₹1500 be credited? Get the latest updates on the 3rd installment and future payments).
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात 4500 रुपये आणि 1500 रूपये जमा होणार होते. त्यापैकी सध्या फक्त जुलै आणी ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरूनही खात्यात पैसे जमा न झालेल्या महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा झाले आहेत.
रायगडमध्ये 29 सप्टेंबरला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच तारखेला महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता जमा होईल असे बोलले जात होते. मात्र सरकारकडून वेळेआधीच बँकांना योजनेचे पैसे पाठवण्यात आल्याने जुलै आणी ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांच्या खात्यात काही कारणास्तव पैसे जमा होऊ शकले नव्हते त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणी सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 रुपये जमा करण्याची प्रक्रिया लवकर सुरु झाली.
1500 रुपये कधी जमा होणार?
सद्यस्थीतीत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 4500 रूपये जमा झाले आहेत. ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत व त्यातील ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. व ज्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे 3000 रूपये जमा झाले होते अशा महिलांच्या खात्यात आज संध्याकाळ ते उद्या रात्रीपर्यंत लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होतील अशी माहिती मिळाली आहे.