Ladki Bahin Yojana : ‘या’ महिलांच्या खात्यात जमा होणार 4500 रुपये, देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा खुलासा

4 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana 4500 Rs Payment Update Devendra Fadnavis

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Latest Update : 15 ऑगस्टपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून आज 19 ऑगस्टपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत मात्र अर्ज पात्र ठरले असूनही काही महिलांच्या बँक खात्यात काही तांत्रिक अडचणीमुळे पैसे जमा झाले नाहीत. अशा महिला उद्यापासून याची तक्रार नोंदवू शकतात.

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचे मिळून 3 हजार रूपये जमा झाले आहेत. ज्या महिलांनी 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत अर्ज केले आहेत. आतापर्यंत त्यांच्याच खात्यात पैसे जमा झाले आहेत. दरम्यान, 31 जुलैनंतर अर्ज करणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात पैसे कधी जमा होणार? असा प्रश्न महिला वर्गातून विचारला जात आहे. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. त्याबद्दल जाणून घ्या…

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

महाराष्ट्र सरकारने 1 जुलैपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली. यानंतर लगेचच लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. सबंध महाराष्ट्रातून लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले. आता 14 ऑगस्टपासून अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. मात्र, अनेक महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केला आहेत. या महिल्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार? हा प्रश्न ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना पडला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

पुन्हा आशीर्वाद द्या पुढच्या मार्चपर्यंतची व्यवस्था करतो

पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक आरोप करत आहेत फक्त दोन-तीन महिने लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार त्यानंतर पैसे मिळणार नाहीत, पण मी तुम्हाला सांगतो, अजित पवारांनी अर्थसंकल्पामध्ये मार्चपर्यंतच्या पैशाची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही आम्हाला पुन्हा आशीर्वाद द्या आम्ही पुढच्या मार्चपर्यंतची व्यवस्था करतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

31 जुलै नंतर अर्ज भरलेल्या महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होतील

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, 31 जुलैपर्यंत फॉर्म भरले असलेल्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत. आता महिलांनी 31 जुलै नंतर भरलेल्या फॉर्मची छाननी होईल, आणी त्यानंतर 31 जुलै नंतर फॉर्म भरलेल्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे 4500 रुपये एकत्रच मिळतील. लाडकी बहीण योजना ही खटाखट योजना नसून फटाफट योजना आहे. थेट पैसे खात्यात जातात, अस देवेंद्र फडणवीस म्हणाले.

🔴 हेही वाचा 👉 Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना अर्ज भरलाय, पैसे मिळाले नाहीत? मग हे काम करा.

माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज रिजेक्ट होण्याची कारणे 

देवेंद्र फडणवीस म्हणाले: आम्ही लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यावर तुमच्या सावत्र भावांच्या पोटात खूप दुखू लागलं. सावत्र भावाने ही योजना बंद पदवी म्हणून खूप प्रयत्न केले. त्यासाठी ते पहिला कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक चुकीचे फॉर्म भरून घेतले आणि महिलांच्या फॉर्मवर पुरूषांचे फोटो लावले. जेणेकरून महिलांना सांगता येईल, तुमचे अर्ज भरलेत, पण सरकारने ते मंजूर केले नाहीत. काही महिलांच्या फॉर्मवर तर मोटरसायकल, बागेचे फोटो लावले होते. जेणेकरून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजे आणि महिलांना योजनेचे पैसे मिळू नयेत असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केला.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article