Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Application Rejected Problem Solution : माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेले अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत. तुमचाही अर्ज रिजेक्ट झाला असल्यास काय करायचं? पुन्हा अर्ज करायचं की नाही? नेमकं काय करायचं याबद्दल जाणून घेऊयात… (what to do if ladki bahin form is rejected).
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या आणी 31 जुलै पूर्वी ज्या महिलांचे अर्ज पात्र ठरले होते अशा महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जुलै आणी ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. अशातच सरकारकडून अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत. काही महिला पात्र असून देखील त्यांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत अशा महिलांच्या तक्रारी येत आहेत. अशा महिलांना आता दिलासा मिळणार असून. खरच पात्र असूनही काही तांत्रिक कराणांमुळे अर्ज रिजेक्ट झाला असल्यास तो अर्ज पात्र ठरला जाईल आणी त्यांच्याही खात्यात सप्टेंबर महिन्यात 4500 रुपये जमा होतील.
माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म नाकारल्यास काय करावे?
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केल्यानंतर अर्ज Approve झाला तरी आणी जरी Reject झाला असला तरी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक मेसेज येतो. त्याद्वारे तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर (Approve) झाला आहे की नामंजूर (Reject) ते समजते. जर तुमचा अर्ज Reject झाला असेल तर, सर्वात आधी वेबसाईटवर जाऊन लॉग इन करा. वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज का रिजेक्ट करण्यात आला आहे याचे कारण सांगितले जाईल.
तुमचे आधारकार्ड अपलोड केले नसणे किंवा जन्म दाखला, रेशन कार्ड अपलोड केले नसणे, तुमचा फोटो व्यवस्थित दिसत नसणे त्याचबरोबर तुम्ही अपलोड केलेली कागदपत्रे व्यवस्थित दिसत नसणे, अश अनेक करणापैकी तुमचा अर्ज रिजेक्ट केला गेल्याचे कारण तिथे तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर तुम्हाला पुन्हा तुमची कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर जाऊन पुन्हा कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमचा अर्ज (Approve) मंजूर होऊ शकतो.
माझी लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरु असून 31 जुलै पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. 31 जुलैनंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरु झाली असून त्यांनाही लाडकी बहीण योजनेचा लवकरच लाभ देण्यात येईल. आत्तापर्यंत या योजनेसाठी 2 कोटी 6 लाख 14 हजार 990 अर्ज आले होते. यापैकी 1 कोटी 47 लाख 42 हजार 476 अर्ज पात्र ठरले आहेत.