Majhi Ladki Bahin Yojana Latest News : राज्य सरकारने जुलै महिन्यात सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील 2 कोटी 34 लाख महिला पात्र ठरल्या असून या महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता जमा झाला आहे. पण यातील काही महिला डिसेंबर नंतर लाभपासून वंचित राहतील अशी माहिती समोर आली आहे. (December 2024 may be the last payment for some beneficiaries of Majhi Ladki Bahin Yojana due to eligibility checks. Find out why certain women may be ineligible for future payments).
राज्यात जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये डिबीटीद्वारे थेट जमा केले जातात.
लाडकी बहीण योजनेत काही अनुचित प्रकार घडत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिला व बालविकास विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला होता. त्यानुसार माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्विकरण्याचे अधिकार फक्त अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आले होते.
Majhi Ladki Bahin Yojana December Update : मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेसाठी सध्या पात्र असणाऱ्या काही लाभार्थी महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असूनही त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळेच विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आचारसंहिता संपताच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असून. लाभार्थी ठरलेल्या महिलांची पडताळणी करून ज्या कुटुंबीकडे चारचाकी वाहन असूनही त्या कुटुंबातील एखाद्या महिलेस लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असेल अशा महिलेस अपात्र ठरवले जाईल आणी त्यांच्या खात्यात डिसेंबर नंतरचे हफ्ते जमा होणार नाहीत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी असणाऱ्या पात्रता अटीनुसार, ज्या कुटुंबाकडे ट्रॅक्टर वगळता ईतर कोणतेही चारचाकी वाहन असेल अशा कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
🔴 हेही वाचा 👉 5500₹ कि 2500₹? तुमच्या खात्यात जमा झाला का दिवाळी बोनस?.
दरम्यान, माझी लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास 3 कोटींहून अधिक अर्ज दाखल झाले होते त्यापैकी 2 कोटी 34 लाख महिलांच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्यांचे पैसे जमा झाले आहेत. तर सर्व पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे.