5500₹ कि 2500₹? तुमच्या खात्यात जमा झाला का दिवाळी बोनस? Majhi Ladki Bahin Yojana Latest News

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus Update

Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यात दिवाळीला 5500 रुपये दिवाळी बोनस जमा होणार होता?, आता दिवाळीला केवळ एकच दिवस शिल्लक आहे. तुमच्या खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस जमा झाला का? (Confusion over Diwali bonus for Majhi Ladki Bahin Yojana beneficiaries: Were 5,500 rupees deposited? Find the latest official update and clarification from Maharashtra government).

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात 5500 रुपये दिवाळी बोनस जमा केला जाणार असल्याचे वृत्त होते. काही माध्यमांमध्ये असा दवा केला जात होता कि सरकारकडून लाडकी बहीण योजनेतील दिवाळी बोनस साठी पात्र असणाऱ्या महिलांची एक यादी (Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus List) प्रसिद्ध केली जाणार आहे आणी फक्त त्या यादीत नाव असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस जमा केला जाणार आहे.

🔴 हेही वाचा 👉…तर लाडकी बहीण योजना बंद – उपमुख्यमंत्री अजित पवार.

अदिती तटकरे यांचे महाराष्ट्रातील माता भगिनींना आवाहन

पण वास्तविक, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याच्या बातमीला कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला न्हवता. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ वर देखील याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली न्हवती. तसेच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनीही या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीवर महाराष्ट्रातील माता भगिनींनी विश्वास ठेवून कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन केले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असल्याचे अदिती तटकरे यांनी यापूर्वच जाहीर केले आहे.

🔴 लेटेस्ट अपडेट 👉 लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस अपडेट! लाडक्या बहिनींच्या खात्यात बोनसचे पैसे जमा….

🔴 हेही वाचा 👉 काही महिलांसाठी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता ठरणार शेवटचा हफ्ता.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article