अजूनही पैसे जमा न झालेल्या लाडक्या बहिणींना सरकारने दिली अजून एक संधी! Majhi Ladki Bahin Yojana

2 Min Read
🔴 हे वाचलं का🤞

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : ज्या महिलांच्या बँक खात्यात अजूनही पैसै जमा झालेले नाहीत, त्यांना आता काळजी करण्याची गरज नाही. सरकारने नुकताच एक जीआर काढला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदतही वाढवन्यात आली आहे.

Mazi Ladki Bahin Yojana Latest Update : माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारने आत्तापर्यंत राज्यातील दीड कोटींहून अधिक महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले आहेत. असे असले तरी अजूनही अर्ज केलेल्या अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. ज्या महिलांच्या खात्यात अजूनही पैसै जमा झाले नाहीत, त्यांना आता काळजी करण्याची गरज नाही. कारण सरकारने नुकत्याच काढलेल्या जीआर नुसार पैसे जमा न झालेल्या महिलांना अर्ज भरण्यासाठी पुन्हा एक संधी मिळणार आहे.

ज्या महिलांच्या खात्यात अजूनही पैसै जमा झाले नाहीत त्यांना अर्ज भरण्यासाठी पुन्हा एक संधी मिळणार आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 होती. पण, आता नवीन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर 2024 पर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी

  • * पात्र महिला महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे.
  • * लाभार्थ्याचं वय २१ ते ६५ वर्षांच्या आत असलं पाहिजे.
  • * विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत आणि बेवारस महिलाही या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • * अर्जदाराकडे बँक खातं असलं पाहिजे आणि त्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now