लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी! Majhi Ladki Bahin Yojana Latest News

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Latest News

Majhi Ladki Bahin Yojana Latest News : महाराष्ट्रात 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश राज्यातील महिला आणि भगिनींना आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेला संपूर्ण राज्यातून उदंड प्रतिसाद मिळत असून, या योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचे उद्दिष्ट अधिक बळकट झाले आहे. तुम्ही जर अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नसेल तर नवीन अर्ज कसा करायचा? अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरु होईल? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात… (Latest update on Majhi Ladki Bahin Yojana: Maharashtra’s financial assistance scheme for women to reopen for new applications in December after elections. Check eligibility and application details).

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे. या योजनेंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिलांना दरमहा 1,500 रुपयांची मदत दिली जाते. हे पैसे पात्र महिलांच्या आधारशी लिंक बँक खात्यात डिबीटी द्वारे थेट जमा केले जातात. पात्रतेसाठी अर्जदार महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

ज्या महिलांनी आधीच अर्ज केला आहे त्यांना मिळालेला लाभ

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले होते, तेव्हापासून पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले. आतापर्यंत महिलांच्या खात्यात जुलै ते नोव्हेंबर असे 5 महिन्यांचे हप्ते जमा झाले आहेत. या योजनेसाठी आतापर्यंत राज्यातील 2 कोटी 34 लाख महिला पात्र ठरल्या असून येत्या काळात पात्र महिलांची संख्या 3 कोटीच्या घरात जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजना दिवाळी बोनस अपडेट! लाडक्या बहिनींच्या खात्यात बोनसचे पैसे जमा.?

🔥 डिसेंबरपासून लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 1500 नाही 3000 रुपये? महायुतीच्या बड्या नेत्याची मागणी Majhi Ladki Bahin Yojana Latest News.

अर्ज प्रक्रिया

माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना हे लक्षात ठेवावे लागेल की आता त्यांना केवळ अंगणवाडी केंद्रातूनच अर्ज भरता येतील. अर्ज भरण्याचे ईतर सर्व पर्याय बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे इच्छुक महिलांनी त्यांच्या जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधावा.

🔴 हेही वाचा 👉 लाडक्या बहिणींना दिवाळी भेट! उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

राज्य सरकारने माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत वाढवली होती. यापूर्वी ही तारीख 30 सप्टेंबर होती. पण सध्या राज्यात निवडणुकीमुळे आचारसंहिता सुरु असल्याने अर्ज प्रक्रिया बंद आहे.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केलेल्या महिलांसाठी महत्वाची बातमी! …तरच जमा होतील पैसे.

नवीन अर्ज करण्याची संधी

ज्या महिलांना काही कारणास्तव लाडकी बहीण योजनेसाठी यापूर्वी अर्ज करता आला नाही त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबर महिन्यात नवीन अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.

🔴 व्हायरल 👉 मोफत भांडी संच मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा? सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article