Majhi Ladki Bahin Yojana Third Installment Status: या महिन्याच्या अखेर पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्याकडून देण्यात आली होती. पण सरकार कडून बँकांना लवकरच पैसे पाठवण्यात आल्याने बँकेकडून 25 सप्टेंबरलाच पैसे हस्तांतरणास सूरूवात झाली. (Majhi Ladki Bahin Yojana continues with the third installment of ₹1500 and ₹4500 being transferred to women’s bank accounts today. Check updates on the scheme here).
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी तिसऱ्या टप्प्यात किती महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबरला 34,34,388 भगिनींना 1545.47 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरीत करण्यात आला आहे. 26 सप्टेंबर रोजी 38,98,705 भगिनींना 584.8 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरीत करण्यात आला आहे. तर काल 29 सप्टेंबर रोजी 34,74,116 भगिनींना 521 कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरीत करण्यात आला असून आज 30 सप्टेंबर रोजीही लाभ हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे.
माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर होऊनही ज्या महिलांच्या बँक खात्यात जुलै आणी ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाले नव्हते अशा महिकांच्या बँक खात्यात जुलै, ऑगस्ट आणी सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित 4500 रुपये जमा करण्यात येत असून. यापूर्वी ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते त्यांच्या खात्यात तिसऱ्या हफ्त्याचे 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत. पैसे जमा करण्याची प्रक्रिया आजही सुरु राहणार आहे. आज 30 सप्टेंबरला रात्री पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.
दरम्यान अद्याप ज्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या बँक खात्यात आज रात्री पर्यंत पैसे जमा होतील. आणी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर पर्यंत होती. मिळालेल्या माहितीनुसार, माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात येणार आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येईल. आता ईथुन पुढे अर्ज करणाऱ्या महिलांना यापूर्वीच्या हफ्त्याचा लाभ मिळणार नाही. महिला ज्या महिन्यात अर्ज करतील फक्त त्याच महिन्याचा लाभ देण्यात येणार आहे.