लाडक्या बहिणींसाठी दादांकडून व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरु, Majhi Ladki Bahin Yojana Maharashtrawadi Helpline

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Maharashtrawadi WhAtsapp Helpline

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Helpline Number : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी 31 जुलै नंतर दाखल करण्यात आलेल्या अर्जाची छाननी सुरु झाली आहे. महिलांना अर्ज करताना अनेक अडचणी येत आहेत. त्याचबरोबर अनेक महिलांनी केलेले अर्ज मंजूर न होता त्यांना अर्ज रिसबमिट करण्याचा पर्याय दिसत आहे. अशात महिलांना काय करावे? त्यांना लाडकी बाहीन योजनेबानात असणाऱ्या अडचणीची कुठे चौकशी करावी असा प्रश्न सतावत होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मार्ग काढला आहे.

महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना कागदपत्रांबाबत, मोबईल नंबरशी आधार लिंक नसणे, बँक खात्याशी आधार लिंक नसणे, बऱ्याच काळापासून अर्जाचे स्टेट्स पेंडिंग दाखवत असणे अशा अनेक अडचणी येत होत्या. यासाठीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ‘महाराष्ट्रवादी’ हेल्पलाईन (Maharashtrawadi Helpline) सुरु केली आहे. 

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

लाडक्या बहिणी ‘महाराष्ट्रवादी’ व्हॉट्सॲप हेल्पलाईन वरून माहिती मिळवण्यासाठी 9861717171 या क्रमांकाशी संपर्क साधून लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांच्या समस्या सांगू शकतात. या समस्या सांगितल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 72 तासांच्या आत लाडक्या बहिणींशी संपर्क साधला जाईल आणि त्यांच्या समस्या सोडवल्या जातील.

महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबरवर समस्या कशा सांगायच्या?

  • 1: 9861717171 या नंबरवर व्हॉट्सअप करा.
  • 2: भाषा, जिल्हा, मतदारसंघ, लिंग इत्यादी गोष्टी निवडा.
  • 3: योजना निवडा.
  • 4: मदत पर्याय निवडा.
  • 5: समस्येनुसार पर्याय निवडा.
  • 6: तुमची तक्रार नोंदवली जाईल.
  • 7: महाराष्ट्रवादी सपोर्ट टीम तुमच्याशी संपर्क साधून तुमच्या तक्रारीचे निवारण करेल.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article