Majhi Ladki Bahin Yojana Latest Update : 14 ऑगस्ट पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती. सध्या 1 कोटिपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. पण अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होताच ते पैसे थकीत कर्जापोटी कापून घेतले आहेत. तुमचेहे पैसे बँकेत कट करून घेतले असतील तर बँकेकडून ते कसे परत मिळवायचे ते जाणून घ्या… (majhi ladki bahin yojana money deducted from bank account solution)
लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेत जमा झाल्याचा मोबाइलवर आलेला संदेश पाहून अनेक महिला आनंदित झाल्या पण त्यांचा आनंद काहीच काल टिकला. झालं असं, अनेक महिलांचे बँक खाते वापरात न्हवते. तर काही महिलांच्या खात्यात मिनिमम बॅलेन्स मेंटेन न्हवता, तर अनेकांचे कर्ज थकीत होते. त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेत जमा होताच बँकेने महिलांना कोणतीही पूर्वकल्पना न देता ते पैसे परस्पर कापून घेतले. त्यामुळे सरकारने महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊन सुद्धा अनेक महिलांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नसल्याने महिलांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे.
तुमचेही पैसे जर बँकेने कापून घेतले असतील तर काय करावे?
What to do if majhi ladki bahin yojana money deducted from bank:
जर तुम्हालाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला असेल. आणी सरकारकडून तुमच्या खात्यात पैसे जमा केल्यानंतर बँकेने ते पैसे कापून घेतले असतील. तर अशा परिस्थितीत पीडित महिलांनी संबंधित बँक व्यवस्थापकांना लाडकी बहीण योजनेचे जमा झालेले पैसे परत मिळण्याबाबत अर्ज द्यावा. बँकेला अर्ज देताच बँकेकडून ती रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये परत जमा केली जाईल. सरकारकडून तशा सूचना सर्व बँक व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत.
त्यामुळेच जर बँकेने तुमच्या खात्यात जमा झालेले लाडकी बहीण योजनेचे पैसे कापून घेतले असतील तर वर सांगितल्याप्रमाणे बँक व्यवस्थापकांना पैसे परत मिळण्याबाबत अर्ज करा. तुमच्या खात्यात बँकेकडून पैसे जमा करण्यात येतील व ते पैसे तुम्ही बँकेतून केव्हाही काढू शकाल.