Majhi Ladki Bahin Yojana Latest News : राज्यात जुलै महिन्यापासून महिलांनासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यातील महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या योजनेसाठी आत्तापर्यंत राज्यातील जवळपास 2 कोटी 40 लाखांहून अधिक महिला लाभार्थी ठरल्या आहेत. (Chief Minister Eknath Shinde provided important information regarding the next installment of Majhi Ladki Bahin Yojana. Find out when the next benefit will be released).
Majhi Ladki Bahin Yojana Money Update: माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये सरकारकडून दरमहा 1500 रुपये जमा केले जात असून. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये अॅडव्हांस जमा करण्यात आले आहेत. पण सध्या निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली असल्याने राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळेच महिलांना पुढचा हफ्ता कधी जमा होणार? असा प्रश्न पडला आहे. याच उत्तर आता समोर आल आहे.
लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव येथील मुक्ताईनगरमध्ये महायुतीच्या मेळाव्यात बोलताना माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कुणीही लाडकी बहीण ही योजना बंद पाडू शकणार नाही. सावत्र भावांनी या योजनेत खोडा घातला तर त्यांना जोडा दाखवा. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटत राहणार, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहणार, आचारसंहिता संपली की डिसेंबर महिन्याचा हफ्ता बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येईल.