Majhi Ladki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत असताना महिलांकडून फॉर्म भरण्यासाठी ३०० रुपये घेतले जात होते. याला विरोध केल्याने एका व्यक्तीस जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या पत्नीसही फोन करून धमकी दिल्याचा प्रकार ठाण्यातील डोंबिवलीजवळील सागाव चेरानगर येथे घडला आहे. (In the Majhi Ladki Bahin Yojana, women in Thane were reportedly charged 300 rupees for form submission; a person opposing this was threatened with death).
डोंबिवलीजवळील सागाव चेरानगर परिसरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी आलेल्या महिलांकडून काही जणांनी प्रतिफॉर्म भरण्यासाठी ३०० रुपये घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे.
Majhi Ladki Bahin Yojana News Threat Case : या प्रकाराविरोधात आवाज उठवणारे धीरज तिवारी यांना राजन पांडे या व्यक्तीने जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत धीरज तिवारी यांना जीवे ठार मारण्याची धमकी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी राजन पांडे याच्याविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. धीरज तिवारी यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.
🔴 हेही वाचा 👉 Dhanteras 2024 धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या, कायदेशीररीत्या तुम्ही घरात किती सोने ठेवू शकता.
धीरज तिवारी हे सागाव येथील रहिवासी असून, त्यांनी सांगितले, ”काही लोक गरीब महिलांकडून लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी पैसे घेत होते. पण वास्तविक या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कोणतीही फी लागणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले असतानाही महिलांकडून फॉर्म भरण्यासाठी ३०० रुपये घेतले जात होते. याबाबत धीरज तिवारी यांनी विरोध केला असता एका महिलेने त्यांच्या पत्नीस फोन करून धमकी दिली. “तुम्हाला डोंबिवली मध्ये राहायचे आहे की नाही?” असा प्रश्न विचारून त्यांनी तिवारी कुटुंबाला धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच राजन पांडे या व्यक्तीने धीरज तिवारी यांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या सर्वाची साक्ष असल्याचे धीरज तिवारी यांनी सांगितले आहे. या घटनेच्या विरोधात तिवारी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात राजन पांडे यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.