Majhi Ladki Bahin Yojana Payment Date : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ज्या महिलांचे 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान अर्ज मंजूर झाले होते त्यांच्या खात्यात 3000 रुपये जमा करण्यात आले असून 31 जुलै नंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात 4500 रुपये कधी जमा होणार याबाबतची माहिती समोर आली आहे.
Majhi Ladki Bahin Yojana Latest Update : ज्या महिलांचे अर्ज (Approve) मंजूर झाले आहेत पण त्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नाहीत त्यांनी हे लक्षात घ्यावं की: (31 जुलै पर्यंत ज्या महिलांचे अर्ज (Approve) मंजूर करण्यात आले होते त्या महिलांच्या खात्यात सध्या 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत). जर तुमचा अर्ज 31 जुलै नंतर मंजूर करण्यात आला असेल तुमच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले नाहीत. ते कधी जमा होतील? याबाबत जाणून घ्या…
1 ऑगस्टपासून अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात कधी जमा होणार पैसे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत. त्यांचा निधी 31 ऑगस्टपासून वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री (Aditi Tatkare) आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार असून या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. म्हणजेच 1 ऑगस्टपासून अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टपासून 4500 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी आलेल्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरु असून 31 जुलै पर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता, त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. 31 जुलैनंतरच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सध्या सुरु आहे. आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी 2 कोटी 6 लाख 14 हजार 990 अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 1 कोटी 47 लाख 42 हजार 476 अर्ज पात्र ठरले आहेत.