देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं अनेक महिलांच्या खात्यात पैसे का जमा झाले नाहीत? Majhi Ladki Bahin Yojana

3 Min Read
🔴 हे वाचलं का🤞

Majhi Ladki Bahin Yojana Payment Not Credited : महाराष्ट्रातील करोडो महिलांच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले असले तरी अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बाहीन योजनेचे 3000 रुपये अजून जमा झालेले नाहीत. आम्ही बँक खात्याला आधार लिंक करून देखील आमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून का जमा झाले नाहीत? असा प्रश्न अनेक महिलांना सतावत आहे. तुम्हीही तुमच्या बँक खात्याला आधार लिंक केले असेल आणी तरी अद्याप तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील तर ही बातमी वाचा. तुमच्या मनातील शंकेचे नक्कीच समाधान होईल.

Majhi Ladki Bahin Yojana Latest Update : सुरुवातीला रक्षाबंधनच्या 2 दिवस आधी म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली होती. पण 14 ऑगस्ट पासूनच महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. आणी 15 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होत असल्याच्या बातम्या सर्वच माध्यमांतून प्रसिद्ध झाल्या. महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया 19 ऑगस्ट (रक्षाबंधन) पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती महिला-बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Sunil Tatkare) यांनी दिली होती.

19 ऑगस्ट उलटून गेला तरी अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. त्यातील बहुतांश महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा न होण्याचे कारण बँक खात्याशी आधार लिंक नसणे हे होते. पण अनेक महिलांचे एकच बँक अकाउंट असून त्यांचे बँक आधारशी लिंक आहे तरी त्यांच्या खात्यात का पैसे जमा झाले नाहीत या प्रश्नामुळे एकच संभ्रम निर्माण झाला. आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार की नाही? असा प्रश्न महिलांकडून विचारला जाऊ लागला.

अनेक महिलांचे बँक खाते आधारशी लिंक असूनपण त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे का मिळाले नाहीत?

1 जुलै पासून माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आणी त्यानंतर लगेचच अर्ज प्रक्रिया सुरु झाली. अनेक महिलांनी लगेच अर्ज केले तर काही महिलांना अर्ज करण्यास उशीर झाला. त्यामुळेच अनेक महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत..

सध्या 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा करण्यात आले असून. ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्यांपैकी बऱ्याच महिलांच्या अर्जाचे स्टेट्स अजून (Pending) पेंडिंग दाखवत आहे. म्हणजेच त्यांचे अर्ज तपासण्याचे काम अजून सुरु आहे. त्यामुळेच आधार बँक खात्याशी लिंक असूनपण “ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत”.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जुलैपर्यंत फॉर्म भरले असलेल्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत. आता महिलांनी 31 जुलै नंतर भरलेल्या फॉर्मची छाननी होईल, आणी त्यानंतर 31 जुलै नंतर फॉर्म भरलेल्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे 4500 रुपये एकत्रच मिळतील. लाडकी बहीण योजना ही खटाखट योजना नसून फटाफट योजना आहे. थेट पैसे खात्यात जातात, अस देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now