Majhi Ladki Bahin Yojana Payment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या आणी ज्या महिलांची एका पेक्षा जास्त बँकेत खाती आहेत अशा महिलांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे तुमची जर एकापेक्षा जास्त बँकेत खाती असतील तर त्यातील जे खाते तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल त्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मोठ्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर करायचे असल्याने प्रत्येक महिलांच्या बँक खात्यावर स्वतंत्र पैसे पाठवणे शक्य नाही.
महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली असून. एकापेक्षा अधिक बँक अकाऊंट असलेल्या महिलांच्या नेमक्या कोणत्या बँकेत पैसै जमा होणार आहेत याबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे. तुमचीही एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खाती असतील तर तुमच्या कोणत्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार ते तुम्ही आधारकार्डचा वापर करून जाणून घेऊ शकता.
अर्जात भरलेल्या बँक खात्यातच का जमा होणार नाहीत पैसे?
लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यासाठी DBT प्रणालीचा वापर केला जात आहे. करोडो महिलांच्या बँक खात्याचा तपशील भरून स्वतंत्र पैसे पाठवणे शक्य नाही. त्यासाठी DBT प्रणालीचा वापर केला जातो. डीबीटी प्रणालीचा वापर एकाचवेळी मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यासाठी केला जातो. या प्रणालीचा वापर करण्यासाठी फक्त आधारकार्ड क्रमांकाची आवश्यकता असते. आधार कार्ड नंबरचा डेटा सिस्टीम मध्ये अपलोड केला जातो आणी आधार क्रमांकावरून त्या आधारशी लिंक असणाऱ्या सर्व बँक खात्याची माहिती एकाच वेळी मिळते. त्यामुळेच एका पेक्षा जास्त खाती असणाऱ्या महिलांच्या आधारशी लिंक असणाऱ्या बँक खात्यातच पैसे जमा होतील.
तुमच्या आधारशी लिंक असलेले बँक खाते कसे चेक करायचे
- 1: आधारशी लिंक बँक खाते चेक करण्यासाठी https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
- 2: तुमचा 12 अंकी आधारकार्ड क्रमांक टाकून लॉग इन करा.
- 3: त्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल.
- 4: तो ओटीपी तिथे असणाऱ्या बॉक्समध्ये भरा, मग तिथे तुम्हाला आधारशी संबंधित अनेक पर्याय दिसलीत. त्यातील Bank Seeding Status या पर्यायावर क्लिक करा.
- 5: येथे तुम्हाला तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक आणि आधारशी लिंक असलेल्या बँकेचे नाव दिसेल. तसेच ते खाते चालू आहे की नाही हे सुद्ध कळेल.
तिथे दिसणाऱ्या तुमच्या बँक खात्यात माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रूपये जमा झाले असण्याची शक्यता आहे. त्यासाठी एकदा तुमच्या आधारशी लिंक बँक खात्याचा बॅलन्स चेक करा.