Majhi Ladki Bahin Yojana Self Certificate: लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना अर्जदार महिलांना एक हमीपत्र द्यावे लागते. या हमीपत्रातील चौथी अट लक्षपूर्वक वाचणे गरजेचे आहे. यामागचे कारण काय? चौथ्या अटीत नेमकं काय आहे? ते जाणून घ्या…
Majhi Ladki Bahin Yojana Self Certificate: महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. अर्ज करताना महिलांना एक हमीपत्र (Self Certificate) द्यावे लागते. हमीपत्र भरून अपलोड करण्यापूर्वी हमीपत्रातील चौथी अट लक्षपूर्वक वाचणे गरजेचे आहे. यामागचे कारण काय आहे? आणि चौथ्या अटीत नेमके असं काय आहे? सविस्तर जाणून घेऊया.
हमीपत्र म्हणजेच सेल्फ सर्टीफिकेट, या हमीपत्रावर 10 मुद्दे देण्यात आले आहेत. महिलांनी हे 10 हि मुद्दे व्यवस्थित वाचून डाव्या बाजूच्या चौकोनावर बरोबरची खून करायची आहे. तसेच हे 10 मुद्दे भरून झाल्यानंतर उजव्या कोपऱ्यात आपली सही करायची आहे. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला या हमीपत्राचा फोटो काढून तो नारीशक्ती दूत अॅपमधील अर्जदाराच्या हमीपत्राच्या कॉलममध्ये अपलोड करायचा आहे.
🔴 हेही वाचा 👉 अर्जदाराचे हमीपत्र म्हणजे काय?, हमीपत्र कस भराव ते जाणून घ्या.
हमीपत्रातील चौथी अट काय आहे?
हमीपत्रात प्रत्येक अटीची सविस्तर माहिती देण्यात आली असून हमीपत्रातील चौथी अट अतिशय महत्त्वाची आहे. कारण या अटीत घरातील व्यक्ती कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत, असे विचारण्यात आले आहे. जर नसेल तर तुम्हाला बरोबरची खून करायची आहे.
मी स्वत: किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमीत/कायम/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत,” असे हमीपत्राच्या चौथ्या स्वयंघोषणेत लिहिलेले आहे. त्यामुळे एखाद्या महिलेच्या कुटुंबात एखादी व्यक्ती शासकीय सेवेत असेल तर त्या महिलेला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळणार नाही.
🔴 हे वाचल का? 👉 Majhi Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण योजनेच हमीपत्र अस करा अपलोड.
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार?
अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑगस्ट 2024 रोजी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये खात्यात जमा केले जाणार आहेत.