29 सप्टेंबरला बँक खात्यात 1500 रुपये, जुलै-ऑगस्ट अर्ज पात्र 4500 रुपये? Majhi Ladki Bahin Yojana News

1 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana September 29 Payment Update (PC : Aditi Tatkare/FB)

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana September Payment Update : 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ वितरीत करण्यात येणार आहे आणी त्याच बरोबर अर्जात त्रुटी आणी अन्य काही तांत्रिक अडचणींमुळे जुलै आणी ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या काही महिलांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नव्हता अशा महिलांना या तिसऱ्या टप्प्यात योजनेचा लाभ दिला जाणार आहे. (On 29th September, the third installment of the Majhi Ladki Bahin Yojana will be distributed in Raigad. Eligible women will receive ₹1500, while July-August applicants will receive ₹4500).

पुणे आणी नागपूर नंतर आता 29 सप्टेंबर रोजी रायगड येथे लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हफ्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

जुलै आणी ऑगस्ट महिन्यात अर्ज पात्र ठरून देखील ज्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नव्हते अशा महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आणी त्याचबरोबर ईतर सर्व पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जाणार आहेत.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now