Mazi Ladki Bahin Yojana New Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला शहरांसह ग्रामीण भागातूनदेखील मोठा प्रतिसाद मिळतो आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेले मराठी भाषेतील अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत.
Mazi Ladki Bahin Yojana News Today : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेले मराठी भाषेतील अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. मराठी भाषेतील अर्ज नामंजूर होणार नसून, कुणीही गैरसमज करून घेऊ नये अशी माहिती महिला आणि बाल विकासमंत्री आदिती तटकरेंनी दिली. मराठी भाषेतील अर्ज ग्राह्य धरले जाणार असल्याने अर्ज भरलेल्या लाखो लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती दूत App वापरून अर्ज करू शकता. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सरकारने आता https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही नवीन वेबसाइट सुरू केली आहे.
लाडकी बहीण योजना अर्जासोबत जोडायची कागदपत्रे:
- आधार कार्डची दोन्ही बाजूची प्रत.
- अधिवास प्रमाणपत्राची प्रत, पण ते नसल्यास त्याऐवजी महिलेचं 15 वर्षांपूर्वीचं रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि जन्म दाखला, या पैकी कोणतेही एक.
- परराज्यात जन्मलेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणा-या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर तिच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक.
- वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपर्यंत असल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. मात्र पिवळं आणि केशरी रेशनकार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट आहे. त्यासाठी रेशनकार्डच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची एका पानावर प्रत घेऊन ती अपलोड करावी.
- बँक पासबुकची पहिल्या पानाची प्रत अनिवार्य नाही. मात्र ती असल्यास अपलोड करावी.
- यासोबतच अर्जदाराने नमुन्याप्रमाणे हमीपत्र भरायचं आहे. त्यानंतर Form भरल्याचा Message मोबाईलवर येईल तो जपून ठेवायचा आहे.
माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज आलेल्यापैकी ज्या महिलांनी या योजनेचे सर्व पात्रता निकष पूर्ण केले असतील अशा महिलांना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे. अर्ज अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या बँक खात्यात 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान पहिला हप्ता जमा करण्यात येणार आहे.