Majhi Ladki Bahin Yojana September Application : 1 सप्टेंबरनंतर (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार की नाही? त्यांच्या खात्यात नेमके किती रुपये जमा होतील? हा प्रश्न सतावत आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माहिती दिली आहे. (How much money will be deposited in the account of women applying from September 1 for Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana).
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात (Women Account) पैसे जमा होण्यास सूरूवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात प्रत्येकी 3000 रुपये जमा होत आहेत.
1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा लाभ मिळणार की नाही?
ज्या महिलांनी 1 सप्टेंबरनंतर माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले आहेत त्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ मिळणार नाही. आणी आता इथून पुढे ज्या महिन्यात महिला अर्ज करतील त्याच महिन्यापासूनचा महिलांना लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
आत्ता पर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 2 कोटी 40 लाख महिलांचे अर्ज आले आहेत, यापैकी दीड कोटी महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा झाली आहे. उर्वरित महिलांचे बँक खाते, आधार आणि मोबाईल क्रमांक लिंक नसल्याने ते जोडण्याचे काम सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत.