लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलाय पण अजून पैसे जमा झाले नाहीत? मग हे वाचा Majhi Ladki Bahin Yojana Latest News

3 Min Read
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Payment Update 2024

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Latest News : तुम्ही जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल पण तुमच्या बँक खात्यात अजूनही पैसे जमा झाले नसतील तर… (Wondering why your Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana funds haven’t been credited? Learn about payment delays and updates for eligible applicants, including when funds will be disbursed in Maharashtra).

Majhi Ladki Bahin Yojana Payment Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 2 कोटी 34 लाख पात्र महिलांच्या बँक खात्यात नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे जमा झाले आहेत. तुम्ही जर ऑक्टोबर महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल किंवा आधीच अर्ज केला असेल पण अजूनही तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील आणी तुम्ही खात्यात पैसे जमा होण्याची किंवा तुमचा नवीन अर्ज मंजूर झाल्याच्या मेसेज येण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. येथे तुम्हाला तुमच्या शंकेचे नक्कीच समाधान मीळेल.

तुम्ही जर ऑक्टोबर महिन्यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल व तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झाल्याचा मेसेज आला असेल पण तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील तर, डिसेंबर महिन्यात तुमच्या खात्यात तुमचा अर्ज ज्या महिन्यात मंजूर झाला असेल त्या महिन्यापासूनचे 1500 रुपये प्रति महिना याप्रमाणे पैसे जमा होतील.

जर तुम्ही ऑक्टोबर महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केला असेल तर निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी होईल आणी तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला फक्त डिसेंबर महिन्याचा लाभ मीळेल. तुम्ही ऑक्टोबर महिन्यात अर्ज केला असला तरी तुम्हाला तुमचा अर्ज ज्या महिन्यात मंजूर होईल त्याच महिन्यापासूनचा लाभ मीळेल.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये जमा केले जातात. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र महिलांच्या खात्यात जमा केला आहे. तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र महिलांना देण्यात आला आहे. तसेच सर्व पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 आत्तापर्यंत किती महिलांच्या खात्यात जमा झाला दिवाळी बोनस? येथे जाणून घ्या Majhi Ladki Bahin Yojana Diwali Bonus.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article