Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना आजची महत्वाची अपडेट, योजनेत 6 मोठे बदल

3 Min Read
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Updates 2024

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Latest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ते जाणून घ्या…

राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत योजनेत आशा स्वयंसेविकांसाठी सानुग्रह अनुदान योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, ऑनड्यूटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास 10 लाखांची तर कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. कालच्या बैठकीत लाडकी बहीण योनेत 6 महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत पारदर्शकता आणि जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजनेच्या काही नियमांमध्ये बदल केले गेले आहेत.

लाडकी बहीण योजना 6 मोठे बदल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आलेले अर्ज पडताळकणीचे काम चालू आहे. अजूनही बऱ्याच महिलांनी योजनेसाठी अर्ज भरले नाहीत. योजनेच्या नियमांत शिथिलता आणून महिलांना या योजनेचा लाभ सहजासहजी व सुलभरितीने मिळाव यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेत आणखी शिथिलता आणण्यात आली.

माझी लाडकी बहीण योजनेत करण्यात आलेले बदल 

  • १. लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे.
  • २. परराज्यात जन्मलेल्या महिलेला महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह केला असल्यास पतीच्या कागदपत्रांवरून योजनेचा लाभ मिळणार.
  • ३. लाडकी बहीण योजना साठी ग्रामस्तरीय समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करुन दाखवून त्यात बदल केला जाणार.
  • ४. केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. मात्र, त्यांच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा.
  • ५. नव विवाहित महिलांची विवाह नोंदणी लगेच शक्य नसल्यास पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे धरले जाणार.
  • ६. ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात येणार.

शासन निर्णय काढून या बदलांची तत्काळ अंमलबजावणीसाठ सुरू करावी, असा निर्णय कालच्या बैठकीत झाला.

🔴 या फायदेशीर योजनेबद्दल आत्ताच जाणून घ्या 👉 Pm Vishwakarma Yojana 2024 : काय आहे PM विश्वकर्मा योजना?, कुणाला मिळतो लाभ, येथे जाणून घ्या.

19 ऑगस्टला जमा होणार पहिला हफ्ता

माझी लाडकी बहीण योजना अधिक सुलभ बनवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कागदपत्रांमध्ये आणखी शिथिलता देण्यात आली आहे. ग्रामस्तरावरील समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांच्या नावाची यादी वाचन करून दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून 19 ऑगस्टला जुलै आणी ऑगस्ट या 2 महिन्यांची रक्कम 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होईल.

🔴 आजची मोठी बातमी 👉 Ration Card News Maharashtra : आता फक्त ‘या’ एका कागदपत्रावर मिळणार रेशन कार्ड.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now