Ladki Bahin Yojana : 19 ऑगस्टला तुमच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार की नाही, आत्ताच जाणून घ्या

3 Min Read
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Payment Status Check 19 August Marathi

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Payment Status Check : रक्षाबंधनच्या दिवशी 19 ऑगस्टला माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्टचे असे मिळून एकत्रित 3000 रूपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. पण, त्यासाठी योजनेच्या लाभासाठी तुम्ही केलेला अर्ज पात्र ठरणे आवश्यक आहे. तुमचा अर्ज पात्र ठरला असेल तरच 19 तारखेला तुमच्या खात्यात 3000 रुपये जमा होतील. तुम्ही केलेला अर्ज पात्र ठरला आहे की अपात्र ते आता कसे समजणार?

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Form Status Check Online : राज्य सरकारने घोषणा केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महाराष्ट्रातील महिलांना दरमहा 1500 रूपये मिळणार आहेत. येत्या 19 तारखेला रक्षाबंधनच्या दिवशी जुलै आणि ऑगस्टचे असे मिळून एकत्रित 3000 रूपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. पण त्यासाठी तुमचा अर्ज पात्र ठरणे खुप आवश्यक आहे. तुम्ही केलेला अर्ज पात्र ठरला की नाही हे कसे तपासायचे? हे जाणून घेऊयात. (How to check ladki bahin yojana form approved or not maharashtra).

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसै मिळण्यास आता अवघे 13 दिवस उरले आहेत. या 13 दिवसात तुमचा योजनेसाठी केलेला अर्ज पात्र ठरणे खूप आवश्यक आहे. अन्यथा 19 तारखेला तुमच्या खात्यात पैसै जमा होणार नाहीत. त्यामुळे तुमचा अर्ज पात्र ठरला आहे की अपात्र ठरला आहे? हे कस तपासायच? हे जाणून घेऊयात.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेला माझा अर्ज पात्र ठरला आहे की अपात्र?

लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही केलेला अर्ज पात्र ठरला आहे की अपात्र ते जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  • 1: नारीशक्ती दूत ॲप ओपन करा.
  • 2: नारीशक्ती दूत ॲप मध्ये केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करा.
  • 3: येथे तुम्ही केलेले अर्ज दिसतील.
  • 4: तुम्हाला ज्या अर्जाबद्दल माहिती हवी आहे त्या अर्जावर क्लिक करा.
  • 5: तुम्हाला त्या अर्जाची सद्य स्थिति पाहायला मिळेल.

तिथे दिसणाऱ्या स्टेटसमधील ‘या’ पर्यायांचा अर्थ काय?

Approved

जर तुम्हाला अर्जात स्टेटस Approved असे दिसत असेल तर अभिनंदन तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमीट झाला आहे. आता आपल्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. 

Pending for Approval 

तुम्हाला  Pending for Approval हा पर्यंत दिसत असेल तर तुमचा अर्ज अजून चेक केलेला नाही, तुम्ही अजून प्रतीक्षा करावी.

Edit and Resubmit

तुमच्या अर्जात Edit and Resubmit हा पर्याय दिसत असेल तर, तुम्ही तुमच्या अर्जात केलेली चूक दुरुस्त करणे आवश्यक आहे. तुमच्या अर्जात जी चूक दिसत आहे ती चूक दुरुस्त करून अर्ज परत सबमीट करा.

Reject

तुमच्या अर्जात Reject हा पर्याय दाखवत असेल तर तुमचा अर्ज का Reject केला. त्या बद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. त्यासाठी आपला अर्ज रीजेक्ट करण्यात आला आहे.

मराठी भाषेतून केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार

लाडकी बहीण योजनेसाठी ग्रामीण भागातील अनेक महिलांनी मराठी भाषेतून अर्ज भरले होते. आणी मराठी भाषेत भरलेले अर्ज रद्द ठरवले जातील असे वृत्त अनेक माध्यमांमध्ये झळकले होते. त्यामुळे मराठी भाषेतून अर्ज भरलेल्या महिला चिंताग्रस्त होत्या. पण त्या महिलांना आता सरकारने दिलासा दिला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी मराठी भाषेतून केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article