Pm Kisan Yojana 18th Installment Date | pm किसान योजना 18 व्या हप्त्याची तारीख: सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व योजना गरजू लोकांना लाभ देण्यासाठी असतात. तुम्हालाही एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्या योजनेसाठी पात्र असणे आवश्यक आहे. जसं की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना- या योजनेंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत त्यांनाच हप्त्याचा लाभ मिळतो. सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचा लाभ देते आणि हे पैसे प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांना दिले जातात. आता, पुढचा हप्ता म्हणजेच 18 वा हप्ता देखील रिलीज होणार आहे, परंतु 18 वा हप्ता कधी दिला जाऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे का? pm किसान योजना 18 वा हफ्ता कधी मीळेल ते जाणून घेऊयात…
pm किसान योजनेचे आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत?
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २ हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. या योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण 17 हप्ते जारी करण्यात आले असून 9 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 17 व्या हप्त्याचा लाभ मिळाला आहे.
ऑक्टोबरमध्ये 18 वा हप्ता जारी होईल?
pm किसान योजनेचे लाभार्थी असणारे शेतकरी १८ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. १८ वा हप्ता केव्हा मीळेल हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. पण, मीडिया रिपोर्ट्सनुसार pm किसान योजनेचा 18 वा हफ्ता ऑक्टोबरमध्ये दिला जाईल असा दावा केला जात आहे. पण, सरकारकडून १८ वा हप्ता कधी दिला जाईल याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
🔴 हेही वाचा 👉 पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी करावी लागणार ही 3 कामे, Pm Kisan Yojana 18th Installment.
मागील रेकॉर्ड पाहिल्यास, pm किसान योजनेअंतर्गत दिलेला प्रत्येक हप्ता चार महिन्यांच्या अंतराने येतो. अशा स्थितीत जून महिन्यात 17वा हप्ता देण्यात आला आणि त्यानुसार 18वा हप्ता देण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी ऑक्टोबरमध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातच pm किसान योजनेचा 18 वा हप्ता दिला जाऊ शकतो, असे बोलले जात आहे.