पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी करावी लागणार ही 3 कामे, Pm Kisan Yojana 18th Installment

2 Min Read
Pm Kisan Yojana 18th Installment Eligibility Tasks

Pm Kisan Yojana 18th Installment Date | पीएम किसान सन्मान निधी 18 वा हफ्ता : सध्या केंद्र आणि राज्य सरकार अनेक वेगवेगळ्या कल्याणकारी सरकारी योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. यापैकीच शेतकऱ्यांसाठी असणारी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, ज्याचा थेट लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळतो. या योजनेद्वारे सरकार पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्याला 2 हजार रुपयांची मदत देते. जर तुम्हालाही पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल आणि येणाऱ्या 18 व्या हप्त्याचा लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळावा असे वाटत असेल तर तुम्हाला काही कामे पूर्ण करावी लागतील. चला तर मग जाणून घेऊया ही कोणती कामे आहेत जी शेतकऱ्यांनी वेळेवर पूर्ण करणे गरजेचे आहे अन्यथा त्यांचा येणारा 18वा हफ्ता अडकू शकतो…

ई-केवायसी

तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याचा लाभ मिळवायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्ही ई-केवायसी करून घेणे गरजेचे आहे. ई-केवायसी न केल्यास तुम्ही 18 व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकता. तुम्ही अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन ऑनलाईन ई-केवायसी करू शकता किंवा तुम्ही CSC केंद्रावर जाऊनही ई-केवायसी करून घेऊ शकता.

जमीन पडताळणी

तुमचा पीएम किसान योजनेचा १८ वा हप्ता अडकू नये असे वाटत असेल तर निश्चितपणे वेळेत जमीन पडताळणी करा. जे शेतकरी जमीन पडताळणी करणार नाहीत त्यांचे पुढचे हफ्ते अडकणार हे नक्की. पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी जमीन पडताळणी करून घेणे आवश्यक असल्याचे विभागाकडून यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

आधार लिंकिंग

पीएम किसान योजनेशी संबंधित शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आणखी एक काम करणे आवश्यक आहे. वास्तविक, हे काम आधार लिंकिंगचे आहे. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करावे लागेल.  यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेत जावे लागेल.

🔴 हेही वाचा 👉 Pm Kisan Yojana 18th Installment Date: ‘या’ तारखेला मिळणार pm किसान योजनेचा 18 वा हप्ता.

असं तपासा स्टेट्स

लाभार्थी यादीत तुमचे नाव आले आहे की नाही हे पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावा, ‘नो युवर स्टेटस’ हा पर्याय निवडा. आणि तेथे सांगितलेली प्रक्रिया फॉलो करा.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article