PM Kisan Yojana 18th Installment Status चेक | पीएम किसान योजना 18 व्या हफ्त्याचे स्टेटस: जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही भारत सरकारच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या फायदेशीर योजनांपैकी एक असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत सामील झालेच पाहजे. पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये जमा केले जातात.
या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आत्तापर्यंत 17 हप्ते देण्यात आले असून आता लवकरच 18वा हप्ता देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पीएम किसान योजनेसाठी नवीन अर्ज केलेल्यापैकी ज्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत अशा शेतकऱ्यांना 18 व्या हफ्त्याचा लाभ मिळणार आहे. मग तुम्हाला या 18 व्या हफ्त्याचा लाभ मिळणार की नाही? ते कस चेक करायचं? याबद्दल जाणून घेऊयात… (Check if you will receive the 18th installment of PM Kisan Yojana by following these simple steps to verify your payment status on the official website).
तुम्हाला पीएम किसान योजनेचा 18 हप्ता मिळणार की नाही हे कसे कळणार?
जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी नव्याने अर्ज केला असेल आणि तुम्हाला 18 वा हप्ता मिळणार की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करा.
- 1: सर्वप्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावा.
- 2: यानंतर ‘Know Your Status’ पर्यायावर क्लिक करा.
- 3: तुमचा नोंदणी क्रमांक टाका आणी स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड भरा.
- 4: सर्व माहिती योग्यरित्या भरल्यानंतर ‘Get Details’ बटणावर क्लिक करा.
- 5: आता तुम्हाला तुमचे स्टेट्स दिसेल. यावरून तुम्हाला कळेल की तुम्हाला 18 व्या हप्त्याचा लाभ मिळणार की नाही.