डबल धमाका आहे पोस्ट ऑफिसची ही योजना, ‘इतक्या’ वर्षात पैसे दुप्पट! Post Office Scheme For Double Money

2 Min Read
Post Office Kisan Vikas Patra Double Money Investment

Post Office Scheme to Double the Money in Marathi : जर तुम्ही तुमचे पैसे एखाद्या चांगल्या योजनेत गुंतवण्याचा विचार करत असाल जि योजना तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करेल तर अशा परिस्थितीत (Kisan Vikas Patra Yojana) किसान विकास पत्र योजना तुमच्यासाठी खूपच चांगला पर्याय ठरू शकते. 

किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात. जर तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेत पैसे दुप्पट होत असल्या कारणाने आणी ही एक सरकारी योजना असल्याने किसान विकास पत्र योजना भारतात खूप लोकप्रिय झाली आहे. अनेक लोक या योजनेत गुंतवणूक करत आहेत. या योजनेची सर्वात खास गोष्ट म्हणजे यामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या बाजारातील जोखमीचा सामना करावा लागणार नाही. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून ही योजना पूर्णपणे सुरक्षित आहे. चाला तर मग किसान विकास पत्र योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

Mukhyamantri Yojana Doot Online Apply
🔴 हे वाचलं का?🤞

Kisan Vikas Patra Information in Marathi : किसान विकास पत्र योजनेत गुंतवलेले तुमचे पैसे 115 महिन्यांत (9 वर्षे 7 महिने) दुप्पट होतात. सध्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला ७.५ टक्के व्याज मिळत आहे. (Investment Tips in Marathi).

पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. या योजनेत गुंतवणुकीच्या रकमेवरील व्याज चक्रवाढ दराने मोजले जाते त्यामुळेच तुम्हाला चांगले व्याज मिळते.

तुम्ही पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र या योजनेत 1,000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. तसेच तुम्ही एक (Joint Account) संयुक्त खाते उघडूनही किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता.

किसान विकास पत्र योजनेअंतर्गत खाते उघडण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. किसान विकास पत्र योजनेमध्ये तुमचे खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागेल. पोस्टात जाऊन तुम्ही या योजनेमध्ये तुमचे खाते उघडून गुंतवणूक सुरू करू शकता.

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article