RBI90Quiz : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पदवी स्तरावरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी RBI 90 क्विझ सुरू करण्याची घोषणा केली आहे. यात सहभागी होऊन पदवीधर विद्यार्थी रिझर्व्ह बँकेकडून 10,00,000 रुपये जिंकू शकतात.
RBI90Quiz : आरबीआयच्या 90 वर्षांच्या स्मरणार्थ RBI ने पदवी स्तरावरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी RBI 90 क्विझ सुरू करण्याची घोषणा केली आहे. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, RBI 90 क्विझमध्ये सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्न विचारले जातील. ही एक बहुस्तरीय स्पर्धा असेल. त्यानंतर राज्य आणि प्रादेशिक स्तरावरील फेऱ्या होतील आणि RBI 90 क्विझची अंतिम फेरी राष्ट्रीय स्तरावर होईल.
जर तुम्ही पदवीधर विद्यार्थी असाल तर तुम्ही RBI90Quiz मध्ये सहभागी होऊन 10,00,000₹ जिंकू शकता.
RBI90Quiz साठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म लाँच
20 ऑगस्ट 2024 रोजी RBI90Quiz Online Platform launch करताना Rbi गव्हर्नर (Shaktikanta Das) शक्तिकांत दास म्हणाले RBI90Quiz विद्यार्थ्यांमध्ये रिझर्व्ह बँक आणी आर्थिक घडामोडी याबद्दल अधिक जागृकता निर्माण करेल.
RBI90Quiz स्पर्धेसाठीची बक्षिसे
बक्षीस | रक्कम |
---|---|
पाहिले बक्षीस | 10 लाख रुपये |
दुसरे बक्षीस | 8 लाख रुपये |
तिसरे बक्षीस | 6 लाख रुपये |
झोनमध्ये प्रथम | 5 लाख रुपये |
झोनमध्ये द्वितीय | 4 लाख रुपये |
झोनमध्ये तृतीय | 3 लाख रुपये |
राज्यस्तरीय प्रथम | 2 लाख रुपये |
राज्यस्तरीय द्वितीय | 1.5 लाख रुपये |
राज्यस्तरीय तृतीय | 1 लाख रुपये |
rbi 90 quiz registration विनामूल्य असून यासाठी नोंदणी करणाऱ्या विध्यार्थ्यांचे वय 25 वर्षापेक्षा जास्त नसावे. rbi quiz नोंदणी 20 ऑगस्ट पासून सुरु झाली असून 17 सप्टेंबर ही नोंदणीची अंतिम तारीख आहे.
Official Website : RBI90Quiz