Shilpa Shetty Majhi Ladki Bahin Yojana Post : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवर शिल्पा शेट्टीचं मोठं वक्तव्य, शिल्पा शेट्टीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल.
Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्रातील दीड कोटीहून अधिक महिला पात्र ठरल्या असून त्यांच्यांपैकी जवळपास 1 कोटी महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत. रक्षाबंधन चा मुहूर्त साधत राज्य सरकारने रक्षाबंधन च्या आधीच महिलांच्या बँक खात्यात जुलै आणी ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा केले त्यामुळे यंदाचे रक्षाबंधन महिलांसाठी खूपच खास ठरले. खात्यात तीन हजार रुपये जमा झालेल्या महिलांना आता इथून पुढे दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्र सरकारद्वारे सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’वर अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने एक मोठे वक्तव्य केले आहे. शिल्पा शेट्टीने एक्स (twitter) अकाउंट वरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले. शिल्पा शेट्टीने केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महाराष्ट्र सरकार कडून सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे कौतुक करत शिल्पा शेट्टी म्हणाली, महाराष्ट्र सरकारकडून घोषित करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सत्यात उतरली आहे, जे पाहणं अविश्वसनीय आहे! महाराष्ट्रातील दीड कोटीहून अधिक महिलांना आता दर महिन्याला आर्थिक हातभार लाभणार आहे.
शिल्पा पुढे म्हणाली, ‘महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचा फायदा अनेक महिलांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. याचा मला खूप आनंद आहे. राज्य सरकारने घेतलेला मोठा निर्णय म्हणजे महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठी झेप आहे. या चांगल्या उपक्रमाबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन…’ असं शिल्पा शेट्टी म्हणाली.
शिल्पा शेट्टी सध्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर शिल्पा खूपच सक्रिय असते. तिचा सोशल मीडियावार मोठा चाहतावर्ग आहे. शिल्पा शेट्टी सतत स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत असते. शिल्पा शेट्टीने माझी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल ट्विट सोशल मीडियावार सध्या व्हायरल झाले आहे.