UPI Circle Feature | UPI सर्कल वैशिष्ट्य: UPI पेमेंट चा वाढता वापर लक्षात घेत NPCI ने UPI Circle हे नवीन फीचर आणले आहे. (Rbi) आरबीआयने याची घोषणा केली आहे. या नवीन फीचरमुळे आता वापरकर्ते बँक खात्याशिवाय पेमेंट करू शकतील. याद्वारे बँक खाते नसणाऱ्यांना एका दिवसात 5000 रुपयांपर्यंत पेमेंट करता येईल.
UPI Circle Feature: भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने आता UPI सर्कल फीचरमध्ये UPI वापरकर्त्यांसाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. UPI सर्कल फीचरद्वारे एकाच अकाउंटवरून घरातील 5 लोक ऑनलाइन पेमेंट करू शकतात. यासाठी फक्त एकाच व्यक्तीचे बँक खाते असणे गरजेचे आहे.
जर घरातील कुटुंबप्रमुखाचे बँक खाते असेल, आणी त्या घरात अनेक लोक राहात असतील. पण घरात राहणारे वृद्ध, मुले, महिला यांची बँक खाती नसतील तर आता UPI Circle Feature वापरून हे सर्व लोक Upi पेमेंट करू शकतील.
जाणून घ्या UPI सर्कल फीचर काय आहे?
जे लोक त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी स्वतःचे बँक खाते नसल्याने कॅश पेमेंट करतात त्यांना देखील ऑनलाईन पेमेंट करता यावे यासाठी UPI सर्कल फीचर सुरू करण्यात आले आहे. घरातील वृद्ध लोक आणी लहान मुलांसाठी UPI सर्कल फीचर खूप उपयुक्त ठरेल. म्हणजे पालक त्यांचे UPI खाते मुलांसोबत शेअर करू शकतात. कोणताही UPI वापरकर्ता त्याच्या डिजिटल पेमेंटसाठी दुय्यम वापरकर्ते ऍड करू शकतो.