बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी! या तारखेपासून मिळणार मोफत भांडी संच Bandhkam Kamgar Bhandi Yojana News

3 Min Read
Bandhkam Kamgar Bhandi Yojana Free Kit Distribution Maharashtra

Bandhkam Kamgar Bhandi Yojana News : तुम्ही जर बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज केला असेल आणी तुम्हाला या योजनेअंतर्गत अद्याप मोफत भांडी संच मिळाला नसेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बांधकाम कामगारांना आता लवकरच मोफत भांडी संच वितरित करण्यात येणार आहे. त्याची तारीखही समोर आली आहे. (Important news for Maharashtra construction workers! The Bandhkam Kamgar Bhandi Yojana will soon distribute free utensil kits starting from December 2nd. Learn more about eligibility and registration).

Bandhkam Kamgar Yojana New Update: सरकारकडून बांधकाम कामगारांसाठी विविध फायदेशीर सरकारी योजना राबावल्या जातात. बांधकाम कामगारांसाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध फायदेशीर योजनांपैकी एक योजना म्हणजे बांधकाम कामगार भांडी योजना. या योजनेअंतर्गत सरकारकडून बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच देण्यात येतो. आणी विशेष म्हणजे बांधकाम कामगारांना हा भांडी संच पूर्णपणे मोफत मिळतो, त्यासाठी काहीच पैसे भरावे लागत नाहीत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ बांधकाम कामगार नोंदणी करणे आवश्यक आहे. फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळतो. आणी ही नोंदणी करण्यासाठीचा खर्च फक्त 1 रुपया आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, येत्या 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर 2 डिसेंबर पासून बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच वितरणास सुरुवात होणार आहे.

कुणाला मिळणार?

ज्या बांधकाम कामगारांनी याआधी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आहे व ज्यांनी बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज केला आहे त्यातील ज्या कामगारांमचे अर्ज पात्र ठरले आहेत त्यांना 2 डिसेंबर पासून मोफत भांडी संच मिळण्यास सुरुवात होईल.

जर तुम्हीही बांधकाम कामगार असाल व तुम्ही अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसेल तर लवकरात लवकर बांधकाम कामगार नोंदणी करा व भांडी योजनेसाठी अर्ज करा म्हणजेच तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळू शकेल.

Bandhkam Kamgar New Update
Bandhkam Kamgar New Update

बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची?

  • 1: बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईट https://mahabocw.in/ वर जा.
  • 2: ‘Construction Worker:Registration’ वर क्लिक करा.
  • 3: तुमचा आधार कार्ड नंबर आणी मोबाईल नंबर टाकून ‘Proceed to Form’ वर क्लिक करा.
  • 4: 1 रुपया पेमेंट करून अर्ज सक्रीय करा.

मोफत भांडी योजनेसाठी अर्ज कसा करावा?

बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येतो, जर एकापेक्षा जास्त बांधकाम कामगारांनी मोफत भांडी योजनेसाठी अर्ज केला असेल तर अशा परिस्थितीत बांधकाम कामगारांना त्या ठिकाणी समक्ष बोलविले जाते आणी त्यांचे आधार बायोमेट्रिक केले जाते. त्यानंतर तुमचा अर्ज पात्र ठरला तर तुम्हाला बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेचा लाभ मिळतो.

🔴 हेही वाचा 👉 दिवाळी संपताच मविआने केली नवीन योजनांच्या घोषणांची आतिशबाजी महिलांना 3 हजार मुलींना 1 लाख अजून बरच काही….

WhatsApp Group Join Now
मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article