Best Investment Options in India | भारतातील गुंतवणुकीसाठी सर्वोत्कृष्ट योजना: तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी सर्वात सुरक्षित असणारी भारतातील सर्वोत्तम सेवानिवृत्ती गुंतवणूक योजना शोधात असाल तर ही सेवानिवृत्ती गुंतवणूक योजना (Pension Scheme) तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
देशातील वाढत्या महागाईच्या परिस्थितीत आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. भविष्यात आर्थिक अडचणीचा सामना करायला लागू नये यासाठी तुम्हाला आजपासूनच तयारी करावी लागेल आणि ही तयारी म्हणजे योग्य ठिकाणी गुंतवणूक करने. तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळात कोणावरही आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहायचे नसेल, तर तुम्ही आजपासूनच सेवानिवृत्ती योजनेत गुंतवणूक करू शकता. त्यामुळे तुमचे भविष्य सुरक्षित होईल. तुमचे रोजचे 7 रुपये तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी करोडपती बनवू शकतात, कसे आणि कोणत्या योजनेने हे शक्य आहे? ते जाणून घेऊयात…
ही आहे ती सेवानिवृत्ती योजना
तुम्हाला जर तुमचा भविष्य काळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनवायचा असेल तर अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. कमी पैशात गुंतवणूक करून जास्ती नफा मिळवण्यासाठी ही योजना एक चांगला पर्याय आहे.
अटल पेन्शन योजनेचे फायदे | Atal Pension Yojana Benefits
वयाची 18 वर्षे ते 40 वर्षे या वयोगटातील महिला व पुरुष अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेचे वैशिष्ठ म्हणजे तुम्ही या योजनेत जितक्या कमी वयात गुंतवणूक सुरू कराल तितका जास्त नफा तुम्हला मीळेल. 18 व्या वर्षी गुंतवणूक सुरु करणाऱ्यांसाठी तर प्रीमियमची किंमत एक कप चहा ईतकी कमी असेल.
🔴 हेही वाचा 👉 पोस्ट ऑफिसमध्ये ₹500 जमा केल्यास तुम्हाला १५ वर्षाने किती पैसे मिळतील? Post Office 500 Per Month Scheme.
अटल पेन्शन योजना कॅल्क्युलेटर | Atal Pension Yojana Calculator
वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही अटल पेन्शन योजनेत दरमहा किमान रु. 210 ची गुंतवणूक करू शकता आणि ती 30 दिवसांत 7 रुपये प्रतिदिन ईतकी होईल. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर, तुम्हाला दरमहा 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. आपल्या वयानुसार 19 ते 40 वर्षे वयानुसार या योजनेत किती रुपये प्रीमियम भरावा लागेल ते जाणून घ्या:
वय | प्रति महिना प्रीमियम |
---|---|
19 वर्षे | ₹228 |
20 वर्षे | ₹248 |
21 वर्षे | ₹269 |
22 वर्षे | ₹292 |
23 वर्षे | ₹318 |
24 वर्षे | ₹346 |
25 वर्षे | ₹376 |
26 वर्षे | ₹409 |
27 वर्षे | ₹446 |
28 वर्षे | ₹485 |
29 वर्षे | ₹529 |
30 वर्षे | ₹577 |
31 वर्षे | ₹630 |
32 वर्षे | ₹689 |
33 वर्षे | ₹752 |
34 वर्षे | ₹824 |
35 वर्षे | ₹902 |
36 वर्षे | ₹990 |
37 वर्षे | ₹1087 |
38 वर्षे | ₹1196 |
39 वर्षे | ₹1318 |
40 वर्षे | ₹1454 |
अटल पेन्शन योजनेअंतर्गत फक्त तेच लोक गुंतवणूक करू शकतात जे करदाते (Tax Payee) नाहीत. जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला बँकेत बचत खाते (Saving Account) उघडावे लागेल. जर बँकेत आधीपासूनच खाते असल्यास, तुम्ही बँकेतून अटल पेन्शन योजनेचा अर्ज घेऊन तो भरून देऊ शकता. अर्ज भरल्यानंतर तुमचे अटल पेन्शन योजना खाते सुरु होईल.
अस्वीकरण: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे आम्ही कोणताही आर्थिक सल्ला देत नाही. गुंतवणुकीचे कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी कृपया आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.