Maharashtra Free Saree Distribution Akshaya Tritiya Antyodaya Card Holders 2025 : महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरजू कुटुंबांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. त्यात ‘लाडकी बहीण योजना’ (Majhi Ladki Bahin Yojana) या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. याच योजनेंतर्गत अंत्योदय रेशन कार्ड धारक महिलांना मोफत साडी देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक गरजू महिलांना अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मोफत साडीचा (Free Saree Maharashtra) लाभ मिळणार आहे.
राज्य सरकारने वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून ‘एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण’ जाहीर केले असून, त्यानुसार ‘कॅप्टिव्ह मार्केट योजना’ राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी एक साडी मोफत देण्याची योजना आखण्यात आली आहे. सुरुवातीला होळीच्या सणा निमित्त साड्यांचे वाटप सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे अद्याप काही महिलांना साड्या मिळालेल्या नव्हत्या. आता अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या महिलांना साड्यांचे वितरण करण्यात येणार आहे.
Mofat Sadi Yojana : वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते 27 जानेवारी रोजी ‘एक रेशन कार्ड एक साडी’ (Ek Ration Card Ek Sadi) या उपक्रमाचा शुभारंभ झाला होता. या योजनेत राज्यातील सुमारे 24 लाख 87 हजार 375 अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानांमार्फत साड्या वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. काही भागांमध्ये अद्याप साड्यांचे वितरण होऊ शकले नसल्याने आता उर्वरित लाभार्थींना लवकरच साड्या दिल्या जाणार आहेत.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि पेठ तालुक्यात साड्यांचे वितरण रखडले होते. दिंडोरी तालुक्यात 8 एप्रिल रोजी तर पेठ तालुक्यात 9 एप्रिल रोजी साड्या पोहोचल्या आहेत. सध्या साड्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये पोहोचवण्याचे काम सुरू असून, लवकरच साड्यांचे वितरण पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या योजनेंतर्गत सहकारी यंत्रमाग संस्था तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील नोंदणीकृत घटकांकडून साड्यांचे उत्पादन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील विणकर समुदायालाही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ही योजना 2023 ते 2028 या कालावधीसाठी निश्चित करण्यात आली असून, या पाच वर्षांमध्ये दरवर्षी प्रत्येक अंत्योदय रेशन कार्ड धारक कुटुंबाला एक साडी मोफत मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे 24 लाख 87 हजार कुटुंबांना या योजनेचा थेट लाभ होणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 Post Office FD मध्ये पत्नीच्या नावाने 1 लाखांची गुंतवणूक केल्यास 2 वर्षांत किती परतावा मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती.