लाडक्या बहिणींविरोधात आलेल्या तक्रारींवर कारवाईसाठी सरकारकडून काय पाऊले उचलली जात आहेत? Majhi Ladki Bahin Yojana Fake Beneficiaries Action Maharashtra

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Fake Beneficiaries Action Maharashtra

Majhi Ladki Bahin Yojana Fake Beneficiaries Action Maharashtra: महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील (Mazi Ladki Bahin Yojana) अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई सुरु केली आहे. महिलांच्या तक्रारींच्या आधारे हा निर्णय घेतला गेला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. (Maharashtra acts on fake beneficiaries in Majhi Ladki Bahin Yojana. Complaints lead to verification via Income Tax and Transport Departments. Eligible women to keep receiving benefits).

लाडकी बहीण योजना तक्रारींमागील कारण?


‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1,500 ची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, काही महिलांनी निकष डावलून योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. तक्रारीनुसार, वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांनी किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी गाडी असणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे.

सरकारकडून कारवाईसाठी काय पाऊले उचलली जात आहेत?


महिला व बालविकास विभागाने तक्रारींची चौकशी करण्यासाठी आयकर विभाग व परिवहन विभागाकडून माहिती मागवली आहे. त्यानुसार, योजनेचे निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना वगळण्यात येणार आहे. त्यासाठी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्याकडून विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

बनावट कागदपत्रांचा वापर करून योजनेचा लाभ घेतलेल्या महिला


सध्या माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) पात्र असणाऱ्या काही महिला लग्नानंतर कर्नाटक राज्यात स्थायिक झाल्या असूनही त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार स्थानिक अधिकाऱ्यांनी अशा महिलांविरोधात बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेतल्याची तक्रार सरकारकडे नोंदवली आहे.

🔴 हेही वाचा 👉 या महिलांकडून परत घेण्यात येणार पैसे.

सरकारचा पुढील निर्णय


अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, सरकार पात्र महिलांचे हक्क सुरक्षित ठेवेल. जर लाभार्थ्याला इतर सरकारी योजनांतून मदत मिळत असेल, तर फक्त फरक रक्कम देण्यात येईल.

🔥हेही वाचा 👉 काही लाडक्या बहिणींना आता मिळणार 1500 रुपयांपेक्षा कमी रक्कम – अदिती तटकरे.

योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी सुरू


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेच्या लाभार्थ्यांची चौकशी करण्याची सूचना दिली आहे. तक्रारींच्या आधारे अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळण्यात येतील, परंतु पात्र महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थी महिलांना दरमहा लाभ मिळेल. अस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सरकारचा संदेश


महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील गरजू महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देणे आहे. मात्र, योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

महत्त्वाचे

  1. अपात्र महिलांविरोधात तक्रारींसाठी महिला व बालविकास विभागाकडून स्वतंत्र्य हेल्पलाईन सुरु होणार.
  2. आयकर विभाग व परिवहन विभागाच्या अहवालानंतर लाडकी बहीण योजनेची अंतिम यादी जाहीर केली जाईल.
  3. पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ नियमितपणे दिला जाईल.

🔥 हेही वाचा 👉 आज 4 जानेवारी 2025 रोजीचा सोन्याचा भाव.

माझी लाडकी बहीण योजनेतील (Majhi Ladki Bahin Yojana) पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. अपात्र असूनही योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांवर कडक कारवाई करून पात्र महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

मराठी सरकारी योजना बातम्या

🔴 आजच्या ताज्या सरकारी योजना विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी: इथे क्लिक करा.

Share This Article
WhatsApp Group Join Now