Majhi Ladki Bahin Yojana Latest News : वेळ पडल्यास तुरुंगात जाईन पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद पडू देणार नाही आणी लाडकी बहीण योजनेची रक्कम तीन हजार रुपये करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Maharashtra CM Eknath Shinde pledges that Majhi Ladki Bahin Yojana will never be stopped, promising to increase the monthly amount to 3,000 INR, despite opposition challenges).
Majhi Ladki Bahin Yojana 3000 Rupees Eknath Shinde Latest News : शिरोळ येथे लाडक्या बहिणींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते, राज्यातील आमच्या लाडक्या बहिणींच्या शुभेच्छांमुळेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुपरहिट ठरली आहे. ही योजना जाहीर केल्यापासूनच विरोधकांना पोटशूळ उठला आहे. ही योजना बंद पाडण्यासाठी काही सावत्र भाऊ न्यायालयात गेले आहेत. वेळ पडल्यास हा एकनाथ शिंदे तुरुंगात जाईल, पण लाडकी बहीण ही योजना कधीही बंद पडू देणार नाही, तसच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या देण्यात येणारा 1500 रुपयांचा हफ्ता वाढवून 3000 करण्यात येईल.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, राज्य शासनाने महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. त्याला राज्यातील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आम्ही महिलांच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी ही योजना सुरु केली आहे पण विरोधक ही योजना बंद करून चौकशी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे मोठ दुर्दैव आहे. निवडणुकीत जर मला साथ दिली तर लाडकी बहीण योजनेची रक्कम नक्कीच तीन हजार रुपये करण्यात येईल अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.